swiggy delivery boy

ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनी स्विगीने दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांसह पाच शहरांमध्ये ‘सुपर डेली’ सेवा बंद केली आहे. सुपर डेली सेवा बंद करण्यात आलेल्या शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, पुणे आणि हैदराबाद अशा मोठ्या शहरांचा समावेश आहे. 12 मे 2022 पासून या शहरांमध्ये ही सेवा मिळणार नाही(Super Daily service closed from Swiggy).

    मुंबई : ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनी स्विगीने दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांसह पाच शहरांमध्ये ‘सुपर डेली’ सेवा बंद केली आहे. सुपर डेली सेवा बंद करण्यात आलेल्या शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, पुणे आणि हैदराबाद अशा मोठ्या शहरांचा समावेश आहे. 12 मे 2022 पासून या शहरांमध्ये ही सेवा मिळणार नाही(Super Daily service closed from Swiggy).

    ज्या ग्राहकांच्या वॉलेटमध्ये पैसे शिल्लक आहेत, ते परत केले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. 5-7 व्यावसायिक दिवसांमध्ये रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. सुपर डेली सर्व्हिस अंतर्गत, कंपनी दूध, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामान वितरीत करते.

    ग्राहकांना या सेवेसाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. ही सेवा बंद होण्यामागे स्विगीचा तोटा हे कारण असल्याची चर्चा आहे. या आव्हानात्मक काळात खर्च आणि तोटा कमी ठेवण्यावर कंपनी भर देत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीला तोटा झाल्याने ही सुविधा बंद करण्यात आली आहे.