ठाकरे सरकारचा फैसला उद्याच, स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मलिक, देशमुखांनाही मुभा

राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

    मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला कोणतीही स्थगिती दिली नसून हा ठाकरे सरकारला मोठा धक्का असून त्यांना उद्याच अग्निपरीक्षा द्यावी लागणार असून बहुमत चाचणीनंतर ठाकरे सरकारचा फैसला होणार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना बहुमत चाचणीसाठी जाऊ देण्याची मुभाही सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

    राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अभिषेक मनु सिंघवी त्यांची बाजू मांडली. या याचिकेवर सकाळी झालेल्या सुनावणीत कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा एकदा पाच वाजता सुनावणी घेण्याचे कोर्टाने म्हटले होते.

    राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी बहुमत चाचणीसाठी विधान भवनात जाऊ देण्याबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर देशमुख आणि मलिकांना विधान भवनात फ्लोअर टेस्टला उपस्थित राहण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे.