रत्नागिरीतील तब्बल ‘इतक्या’ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन; संप चिघळण्याची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. कारण, गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणे 28 एसटी कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 28 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

    रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. कारण, गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणे 28 एसटी कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 28 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिली असताना एसटी बस चालू ठेवणाऱ्या चालक वाहकांचा सत्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

    दरम्यान या कारवाईनंतर निलंबीत कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिलाय. निलंबीत केलेले कर्मचाऱ्यांनी टिव्ही-9 वर आपली व्यथा मांडलीये. कारवाई केली तरी एसटीच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारच या भुमिकेवर निलंबीत एसटी कर्मचारी ठाम आहेत.

    महाडमध्ये एसटी कर्मचारी कामावर हजर

    एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करुन घ्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बंदचे आंदोलन पुकारले आहे. आरपारच्या लढाईच्या पवित्र्यात कर्मचारी असताना रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एसटी महामंडळाचे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळपासून कंट्रोलर तर सकाळपासून सफाई कामगार कामावर हजर झाले आहेत. संघटनेचा प्रश्न नाही, एखादी संघटना कोणाचे ऐकत नसेल तर त्या संघटनेला मानायची गरज नाही. आम्ही सेवेत हजर झालो आहोत असे मत हजर झालेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.