शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या मागणीसाठी स्वाभिमानीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मुंडण आंदोलन’

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखानदार, प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांचा उभ्या असलेल्या ऊसाला तोड देण्याची मागणी करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

    जालना : जिल्ह्यात तोडणी अभावी 7 ते 8 लाख टन ऊस अजूनही तोडणी अभावी शेतात  ऊस उभा आहे. या ऊसाला तातडीने तोड देण्यात यावी. तोडणी अभावी उभ्या असलेल्या ऊसाला एकरी एक लाखांचं अनुदान देण्यात यावं. या मागणीसाठी आज जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आलं.

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखानदार, प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांचा उभ्या असलेल्या ऊसाला तोड देण्याची मागणी करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. तसेच उभा असलेला ऊस कारखानदारांनी न तोडल्यास न्यायालयीन लढाई करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.