सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन

    बुलढाणा : सोयाबीनला 8 हजार रुपये आणि कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज पासून बुलडाणा मध्ये  अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहेत.

    विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 17 नोव्हेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात रविकांत तुपकर यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती.मात्र रात्री 11 वाजता नागपूर पोलिसांनी त्याना ताब्यात घेतलं व बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी आणून सोडलं पोलिसांनी त्यांना घरी सोडल्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली व त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आंदोलनाला बसले आहेत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहिल असा इशारा तुपकर यांनी दिलाय.