
सिंधुदुर्ग : मालवण तोंडवळी गावातील वाळू व्यवसायिकांकडून २५ हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी वायंगणी (मालवण) येथील विठ्ठल कंठाळे या तलाठ्यास सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
विठ्ठल कंठाळे यास अटक झाल्यानंतर मालवण महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कंठाळे याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा
वाळू व्यावसायिकांनी कंठाळेच्या विराेधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली हाेती. त्यानूसार सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कंठाळे याच्यावर कारवाई केली.