टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक लास्‍ट-माइल गतीशीलता ऑफरिंगमध्‍ये वाढ; आता नवीन टाटा एस ईव्‍ही १००० लाँच

उच्‍च पेलोड क्षमता आणि विस्‍तारित रेंजसह ई-कार्गो गतीशीलत्यामध्ये वाढ केली आहे.

    मुंबई, मे, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज नवीन एस ईव्‍ही १०००च्‍या लाँचसह आपल्‍या ई-कार्गो गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना प्रबळ आहे. लास्‍ट-माइल गतीशीलतेमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासाठी विकसित करण्‍यात आलेला हा शून्‍य-उत्‍सर्जन मिनी-ट्रक १ टनचे उच्‍च प्रमाणित पेलोड आणि एका चार्जमध्‍ये १६१ किमीची प्रमाणित रेंज घेणार आहे. एस ईव्‍ही ग्राहकांकडून मिळालेल्‍या अभिप्रायांसह विकसित करण्‍यात आली असून, ते नवीन व्‍हेरिएण्‍ट एफएमसीजी, बेव्‍हरेजेस्, पेंट्स अँड ल्‍युब्रिकण्‍ट्स, एलपीजी आणि डेअरी अशा विविध क्षेत्रांमधील सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करेल.

    देशभरातील १५० हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल सपोर्ट सेंटर्सचे पाठबळ असलेल्‍या एस ईव्‍हीमध्‍ये प्रगत बॅटरी मॅनेजमेंट सिस्‍टम, फ्लीट एज टेलिमॅटिक्‍स सिस्‍टम आणि दर्जात्‍मक अपटाइमसाठी प्रबळ अॅग्रीगेट्स आहेत. एस ईव्‍ही टाटा युनिईव्‍हर्सच्‍या व्‍यापक क्षमतांचा लाभ घेते, संबंधित टाटा ग्रुप कंपनीजसोबत सहयोग करण्‍यासोबत ग्राहकांना सर्वांगीण ई-कार्गो गतीशीलता सोल्‍यूशन देण्‍यासाठी देशातील आघाडीच्‍या फायनान्शियर्ससोबत सहयोग करते. ही वेईकल वैविध्‍यपूर्ण कार्गो डेक्‍ससह उपलब्‍ध असेल आणि देशभरातील सर्व टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहन डिलरशिप्‍समध्‍ये विक्री करण्‍यात येणार आहे.

    या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या एससीव्‍हीअँडपीयूचे उपाध्‍यक्ष आणि व्‍यवसाय प्रमुख श्री. विनय पाठक म्‍हणाले, ”गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये आमच्‍या एस ईव्‍ही ग्राहकांना अद्वितीय अनुभवाचा फायदा झाला आहे, जे लाभदायी शाश्‍वत आहे. ते क्रांतिकारी शून्‍य-उत्‍सर्जन लास्‍ट-माइल गतीशीलता सोल्‍यूशनचे अॅम्‍बेसेडर्सच्या साहाय्याने बनवण्यात आले आहे. एस ईव्‍ही १००० च्‍या लाँचसह आम्‍ही ग्राहकांना अद्वितीय अनुभव देणार आहोत. आम्‍हाला विश्‍वास आहे की एस ईव्‍ही १००० हरित भविष्‍याप्रती योगदान देईल, तसेच उच्‍च दर्जाचे मूल्‍य आणि मालकीहक्‍काचा कमी खर्च देईल.”

    एस ईव्‍हीमध्‍ये ईवोजेन पॉवरट्रेनची शक्‍तीचा समावेश असून, जी वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि ५-वर्ष सर्वसमावेशक तसेच मेन्‍टेनन्‍स पॅकेजसह अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभव देते. या वेईकलमध्‍ये सुरक्षित, सर्व वातावरणामध्‍ये अनुकूल कार्यसंचालनासह ड्रायव्हिंग रेंज वाढवण्‍यासाठी प्रगत बॅटरी कूलिंग सिस्‍टम व रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग सिस्‍टम आहे. तसेच या वेईकलमध्‍ये उच्‍च अपटाइमसाठी नियमित व जलद चार्जिंग क्षमता आहेत. या वेईकलमध्‍ये २७ केडब्‍ल्‍यू (३६ एचपी) मोटरसह १३० एनएम सर्वोच्‍च टॉर्कची शक्‍ती आहे, ज्‍यामधून दर्जात्‍मक पिकअप व ग्रेडेबिलिटीची आणि संपूर्ण लोड असताना देखील चढणीच्‍या रस्‍त्‍यावर सहजपणे ड्रायव्हिंग होण्‍याची खात्री मिळते.