अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टही डीपफेक तंत्रज्ञानाला पडली बळी, X वर आक्षेपार्ह फोटो व्हायरल; एलॉन मस्कने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

टेलर स्विफ्टचे फोटो समोर आल्यानंतर, 'Taylor Swift AI' हा हॅशटॅग X वर ट्रेंड होऊ लागला.एलॉन मस्क यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन टेलर स्विफ्टचा आक्षेपार्ह फोटो काढून टाकला.

  गेल्या काही दिवसापासून डीपफेक तंत्रज्ञानाद्वारे सेलेब्रिटींचे फोटो, व्हिडिओ बनवणाचे प्रकार समोर येत आहेच. कलाकार मंडळी, खेळाडू सुद्धा या तंत्रज्ञानाला बळी पडले आहेत. याची सुरुवात अभिनेत्री रश्मिका मंदानापासून (Rashmika Mandanna) झाली. नुकतंच तिच्या डिपफेक व्हिडिओ बनवणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र, हे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता प्रसिद्ध अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल  (Taylor Swift AI Deepfakes) झाला आहेत. हा फोटो AI च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे.

  X वर फोटो शेयर

  टेलर स्विफ्टचा हा फोटो AI च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. हा फोटो X वर शेअर करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, 4.5 कोटी लोकांनी हा फोटो पाहिला तर 24,000 हून अधिक लोकांनी हा पोस्ट रिपोस्ट केला. या फोटोला हजारो लाइक्स मिळाले. मात्र, हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान याबाबत तक्रार मिळाल्यानंतर इलॉन मस्क (Elon Musk) यांनी हे फोटो X वरुन हटवले आहेत.

  एलॉन मस्क यांनी उचललं पाऊल

  टेलर स्विफ्टचे फोटो समोर आल्यानंतर, ‘Taylor Swift AI’ हा हॅशटॅग X वर ट्रेंड होऊ लागला.एलॉन मस्क यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन टेलर स्विफ्टचा आक्षेपार्ह फोटो काढून टाकला. एलॉन मस्क यांनी आणखी एक पाऊल उचलले. आता X म्हणजेच ट्विटरवर तुम्ही ‘टेलर स्विफ्ट’ सर्च केलं तर तुम्हाला काहीही दिसणार नाही.तुम्ही ‘टेलर स्विफ्ट एआय’ टाइप करून सर्च केले तरी तुम्हाला स्क्रिनवर काहीही दिसणार नाही. X ने अशा शब्दांवर बंदी घातली आहे, जेणेकरून टेलर स्विफ्टचे आक्षेपार्ह फोटो कोणालाही दिसू नयेत.

  X मधून निवडलेल्या शब्दांवर बंदी घालणे खरोखरच एलॉन मस्क यांचे एक मोठे पाऊल आहे. असे शब्द लिहून एआयच्या गैरवापराची बळी ठरलेल्या टेलर स्विफ्टचा व्हायरल झालेला फोटो कोणालाही बघता येणार नाही. मात्र, तुम्ही फक्त ‘टेलर’ किंवा ‘स्विफ्ट’ टाइप केल्यास, टेलर स्विफ्टशी संबंधित पोस्ट सर्चमध्ये दिसतील.