न्यूझीलंड,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरिजसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन, पृथ्वी शॉला संधी, कोण टीममध्ये, कोण टीम बाहेर, घ्या जाणून?

मुंबईतल्या टी-20 मॅचमध्ये संजूला दुखापत झाली होती. त्याच्याऐवजी जितेश शर्माला संधी मिळालीय. तर पृथ्वी शॉ़चा पुन्हा टी-20 टीममध्ये समावेश करण्यात आलाय. हार्दिक पांड्या टीमचा कॅप्टन असेल तर सूर्यकुमार यादवकडे व्हाईस कॅप्टन्सी असणार आहे.

  मुंबई- बीसीसीआयच्या (BCCI) सिलेक्शन कमिटीनं न्यूझीलंडविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचेस, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 टेस्ट मॅचेसपूर्वी बॉर्डर-गावस्कर  ट्रॉफीच्या आधी होणाऱ्या २ टेस्ट मॅचेससाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. रणजीत (Ranji Trophy) चांगली कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. अनेक चांगल्या प्लेयर्सना बसवण्यात आलंय. तर काही नवे चेहरे टीममध्ये दिसणार आहेत.

  वन डे टीममध्ये काय बदल

  न्यूझीलंडच्या विरोधात १८ जानेवारीपासून ३ वन डे सीरिजसाठी विकेटकिपर म्हणून के. एस. भारतला संधी देण्यात आलीय. के एल राहुल त्याच्या कौटुंबिक कारणानं उपलब्ध नसल्यानं भरतला संधी मिळाली आहे. अक्षर पटेलच्या ऐवजी शाहबाज अहमदला संधी मिळालीय.अक्षरही त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलंय. शार्दूल ठाकूरचाही टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

  टी-20 च्या टीममध्ये कोण

  टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. त्यात संजू सॅमसनचा समावेश नाहीये. मुंबईतल्या टी-20 मॅचमध्ये संजूला दुखापत झाली होती. त्याच्याऐवजी जितेश शर्माला संधी मिळालीय. तर पृथ्वी शॉ़चा पुन्हा टी-20 टीममध्ये समावेश करण्यात आलाय. हार्दिक पांड्या टीमचा कॅप्टन असेल तर सूर्यकुमार यादवकडे व्हाईस कॅप्टन्सी असणार आहे.

  टेस्ट टीममध्ये कोण

  टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन मॅचसाठी टीमची निवड करण्यात आलीय. त्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी मिळालीय. इशान बॅकअप विकेटकिपर असण्याची शक्यता आहे. के एस भरतलाही संधी मिळणार आहे कारण ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. जसप्रीत बुमराह यापैकी एकाही टीममध्ये नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे. तो अजूनही फिट नसल्याचं यामुळं स्पष्ट होतंय. रवींद्र जडेजा टीममध्ये असेल. मात्र त्यापूर्वी त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. टेस्ट टीममध्ये व्हाईस कॅप्टन्सी के एल राहुलकडे देण्यात आलीय.