जागा दहा उमेदवार तेरा; प्रत्येकच पक्षाने आपापल्या शक्तीपेक्षा अधिकचे उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस वाढली

विधान परिषदेच्या निवडणुकीत अचानक उमेदवारांची भाऊ गर्दी तयार झाली असून प्रत्येकच पक्षाने आपापल्या शक्तीपेक्षा अधिकचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत(Ten candidates for thirteen Rajya Sabha seats).

  मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत अचानक उमेदवारांची भाऊ गर्दी तयार झाली असून प्रत्येकच पक्षाने आपापल्या शक्तीपेक्षा अधिकचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत(Ten candidates for thirteen Rajya Sabha seats).

  भाजपाने गुरुवारी आणखी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले त्यात प्रसाद लाड यांचे नाव आधीच पक्षाच्या केंद्रीय समितीने जाहीर केले होते तर मावळते सदस्य सदाभाऊ खोत यांचाही सहावा उमेदवारी अर्ज भाजपाने सादर केला. हे सहाही उमेदवार निवडून आणण्याच प्रयत्न करू, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केले. तर सदाभाऊ खोत यांनी सर्वच पक्षांच्या सदस्यांना मते मागणार असल्याचे सांगितले.

  राष्ट्रवादीनेही एक जादा उमेदवार दिला असून त्यामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असताना दहा जागांसाठी तेरा उमेदवार रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी आपला जादाचा गर्जे यांचा अर्ज परत घेईल असे सांगण्यात येते.

  गर्जे राष्ट्रवादीचे तिसरे उमेदवार

  राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपातून आलेले नेते एकनाथ खडसे यांचा तसचे मावळते सभापती रामराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरला तर त्याच वेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसचे भाई जगताप व चंद्रकांत हांडोरे यांचे अर्ज आज दाखल करण्यात आले.

  मविआत तणाव, बविआचे पत्ते गुलदस्त्यात

  उद्याच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून त्यात शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारीची दोन मते न्यायालयीन निर्णयात अडकल्याने महाविकास आघाडीतील तणाव वाढला आहे. त्यातच एमआयएमची मते शिवसेनेने न मागता ती राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मागितली तर शिवसेनेची राजकीय अडचण होणार नाही व ती मते महाविकास आघाडीकडेच वळतील असा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार कसे मतदान करणार हे अद्यापि उघड केले नाही.

  सहाव्या उमेदवारामुळे चुरस वाढली

  विधान परिषदेच्या रिंगणात भाजपाने सहावा खेळाडू उतरवून निवडणुकीत रंगत आणली आहे. प्रत्यक्षात भाजपाने पाच उमेदवार घोषित केले. त्यातल्या चार अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बुधवारी भरण्यात आले असून, पाचव्या जागेसाठी उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला गेला. तर सहाव्या जागेसाठी भाजपाने शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिला आहे. खोत यांनी अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भाजपा प्रयत्न करणार आहे.