
राज्यातही ओमिक्रॉन व्हेरियंटने हातपाय पसरले असताना आता मराठवाड्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. लातुरमध्ये ओमिक्रॉनबाधित पहिला रुग्ण आढळून आला असून तो औसा इथला रहिवासी आहे.
लातूर : संपूर्ण जगात ओमिक्रॉन व्हेरियंटने दहशत मजवली आहे. राज्यातही ओमिक्रॉन व्हेरियंटने हातपाय पसरले असताना आता मराठवाड्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. लातुरमध्ये ओमिक्रॉनबाधित पहिला रुग्ण आढळून आला असून तो औसा इथला रहिवासी आहे.
आज दिवसभरात Omicron व्हेरियंटचे दोन रूग्ण आढळले आहेत. त्यातील एक रूग्ण हा लातूरमध्ये आढळला आहे. तर दुसरा रुग्ण पुण्यात सापडला आहे. या दोन्ही रूग्णांना आयसोलेट करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची देखील टेस्ट करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात २० ओमिक्रॉन चे रुग्ण
समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 5 रूग्ण आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये हा आकडा 10वर पोहचला आहे. तर पुणे मनपा क्षेत्रात 2 रूग्ण हे ओमिक्राॅनचे आहेत. तसेच कल्याण डोंबिवलीत 1 रूग्ण आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये 1 आणि लातूरमध्ये 1 रूग्ण आहे.
दरम्यान, नुकतीच ओमिक्राॅनविषयी धक्कादायक माहिती समोर आली होती. Omicron मुळे इंग्लंडमधील एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार देखील सतर्क झालं आहे.