आज दहावीचा निकाल, विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता!

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result 2022)आज, 17 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना नेमकं कुठे आणि कसा निकाल पाहता येणार? त्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल – पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ( Maharashtra SSC result ) उद्या दुपारी १ नंतर ऑनलाईन उपलब्ध ( SSC results website links ) होणार आहे.

  https://www.mahahsscboard.in/

  www.mahresult.nic.in

  www.sscresult.mkcl.org

  www.maharashtraeducation.com

  www.mahresult.nic.in