समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर २ जण जखमी

मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३०४ येथे घडला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्य झाला असून दोघ गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले पाचही जण मूळचे छत्तीसगडमधील रहिवासी आहेत.

    समृद्धी महामार्ग ((Samruddhi Mahamarg) तयार झाल्यापासून या महामार्गावर सतत अपघात (Accident) होत आहेत. आत्तापर्यंत झालेल्या अपघातामध्ये अनेकांना आपला देखील गमवावा लागला आहे. पुन्हा एकदा असाच एक अपघात समृद्धी महामार्गावर घडला आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या अपघातामध्ये तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा अपघात . मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३०४ येथे घडला. पहाटेच्या सुमारास घडलेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्य झाला असून दोघ गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले पाचही जण मूळचे छत्तीसगडमधील रहिवासी आहेत. अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू अपघातस्थळी झाला तर इतर दोघांचा मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु असून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.

    अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे

    १. लताबाई पुरुषोत्तम मेहेर
    2.मुकेश अनुज राम मेहेर
    3.अत्मजा मुनोरबोद

    समृद्धी महामार्गावर एकामागोमाग एक सतत अपघात घडत आहेत. सतत घडत असलेल्या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असल्याचे दिसून आले आहे. या महार्गावर रोज काहींना अपघात होत असतात. घडत असलेल्या भीषण अपघातामध्ये अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून नेमका प्रवास करायचा की नाही?असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.