IED found in Delhi revealed to be from Pakistan

    नवा दिल्ली : पाकिस्तान सरकार सध्या त्यांच्या गृहकलहात आणि आर्थिक संकटांनी हैराण असतानाही, शेजाऱच्या राष्ट्रांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यात ते अद्यापही अग्रेसर आहेत. दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेने हे सिद्ध झाले आहे. दिल्लीच्या गाजपूर फुल बाजारात सापडलेले आयईडी हे पाकिस्तानात तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. सीमेवरुन किंवा समुद्राच्या मार्गाने ही स्फोटके भारतात आली असण्याची शक्यता आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीत दहशतवादी कारवायांचा कट यानिमित्ताने उघड झाला आहे(Terrorist plot foiled in the capital before Republic Day; IED found in Delhi revealed to be from Pakistan ).

    सैन्यदलांनी ३ किलो स्फोटके नष्ट केली आहेत. यात आय़ईडीत अमोनियम नायट्रेट, आरडीएक्स, ९ व्होल्डटी बॅटरी आणि लोखंडाचे छोटे तुकडे यांचा समावेश होता. इतर स्फोटके तपासणीसाआठी हरियाणाच्या मानेसर येथील राष्ट्रीय बॉम्ब डेटा सेंटरकडे पाठवण्यात आली आहेत. अफगाणिस्थानातील ड्रग्ज डिलरकडे ही स्फोटके भारतात पोहचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

    सर्किटमध्ये गडबड असल्याने कट उधळला

    रिमोट कंट्रोलद्वारे हा स्फोट घडवण्याचा विचार होता. त्यासाठी आयईडीचा वापर करण्यात आला होता. १ तास १८ मिनिटांचे टायमरही सेट करण्यात आले होते. मात्र या बॉम्बच्या सर्किटमध्ये बिघाड झाल्याने, सुदैवाने हा स्फोट टळला. देशात सांप्रदायिक तणाव निर्माण करणे, हा या स्फोटामागचा हेतू असण्याची शक्यता आहे. नुकतेच जम्मू-काश्मीर आणि पंजाबातही अशी स्फोटके सापडली होती.

    प्रजासत्ताक दिनापूर्वी राजधानीत हाय अलर्ट

    ड्रग्जच्या पैशांनी सातत्याने देशात आयईडी आणण्यात येते आहे. देशात सांप्रदायिक तमाव निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू आहे. उ. प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये या कारवाया करण्याची योजना आखण्यात येते आहे. २६ जानेवारीपूर्वी ही स्फोटके सापडल्याने, संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांची विशेष टीम या प्रकरणाचा तपास करीत आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022