स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी सक्रीय, बांदिपोरामध्ये बिहारच्या मजुराची हत्या

    नवी दिल्लीः स्वातंत्र्य दिन अवघ्या तीन दिवसावर आला असताना जम्मू-काश्मीरमधून (Jammu-Kashmir) एक धक्कादाायक बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून कारवाया (terrorist Attack) वाढल्या आहेत. गुरुवारी केंद्रशासित प्रदेशातील राजौरी जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद झाले होते, त्याचवेळी सुरक्षा दलांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यावेळी घाटीत टार्गेट किलिंगची आणखी एक घटना घडत असतानाच दहशतवाद्यांकडून एका स्थलांतरित बिहारच्या मजुराची हत्या (Migrant Bihar Laborer Killed) करण्यात आली आहे.

    या वर्षात आतापर्यंत दहशतवाद्यांकडून काश्मीरमध्ये 26 जणांना ठार करण्यात आले आहे. या मृत झालेल्यांमध्ये 7 पोलीस आणि 10 नागरिकांचा समावेश आहे. या हत्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांमध्ये एक काश्मिरी पंडित कर्मचारी, एक स्थानिक राजपूत हिंदू आणि जम्मू प्रदेशातील दोन बिगर-मुस्लिमांता समावेश आहे.

    कशी झाली हत्या?

    दहशतवाद्यांकडून ठार करण्यात आलेल्या व्यक्तीच्या मृताच्या भावाने सांगितले की, रात्री 12.20 वाजता माझ्या भावाने मला उठवून गोळीबार सुरू असल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी तो आमच्या आजूबाजूला नव्हता, त्यावेळी तो टॉयलेटला गेला असल्याचे वाटले, मात्र त्याचा शोध घेण्यासाठी ज्यावेळी आम्ही बाहेर गेलो तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर सुरक्षा दलाला या घटनेची माहिती दिली. भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसल्यानंतर आणि सुरक्षादलाला त्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी त्याला हाजीनला हलवण्यास सांगितले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.