टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण: राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

टीईटी परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली आहे. टीईटी परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी अटक केलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरी पोलिसांनी घबाड झापडले आहे. यानंतर महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली(TET exam malpractice case: State Examination Council Commissioner Tukaram Supe suspended; Announcement by Education Minister Varsha Gaikwad).

    मुंबई :  टीईटी परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली आहे. टीईटी परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी अटक केलेले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरी पोलिसांनी घबाड झापडले आहे. यानंतर महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली(TET exam malpractice case: State Examination Council Commissioner Tukaram Supe suspended; Announcement by Education Minister Varsha Gaikwad).

    हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे श्री.सुपे यांचे मुख्यालय राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना श्री. सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

    सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत श्री.सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना दि. १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. श्री.सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये श्री.सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.