उड्डाणानंतर अवघ्या 47 मिनिटांत परतलं एयर इंडियाच विमान, ‘या’ कारणामुळे आलं परत, वाचा नेमकं काय झालं

केरळच्या राजधानीतून सकाळी 8.30 वाजता उड्डाण घेतलेल्या IX 549 या विमानाला वैमानिकाने तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर सकाळी 9.17 वाजता त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले.

    केरळ : गेल्या काही दिवसापासून विमान दुर्घटनेच्या() घटना समोर येत आहे. तांत्रिक बिघाडामुळे () विमान अपघाताला बळी पडतं किंवा त्याच इमेरजन्सी लॅन्डीग कराव्या लागण्याच्या घटनाही अनेकदा घडतात. असाच काहीसा प्रकार आता  केरळमध्ये घडला आहे. त्रिवेंद्रमहून मस्कतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान काही वेळानंतर विमानतळावर परत आले आहे. 

    एअर इंडिया एक्सप्रेसच्या या विमानात 105 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच FMS (फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टम) मध्ये तांत्रिक बिघाडामुळे हे त्रिवेंद्रम विमानतळावर परत ग्राउंड करण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने सकाळी 8.30 वाजता त्रिवेंद्रम येथून उड्डाण केले आणि तांत्रिक बिघाडामुळे ते सकाळी 9.17 वाजता त्रिवेंद्रम विमानतळावर परत आले.

    प्रवाशांसाठी स्वतंत्र विमानाची व्यवस्था

    मिळालेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरम ते मस्कत (ओमान) जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटला टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परत उतरावे लागले. केरळच्या राजधानीतून सकाळी 8.30 वाजता उड्डाण घेतलेल्या IX 549 या विमानाला वैमानिकाने तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर सकाळी 9.17 वाजता त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, “सर्व 105 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.” ते म्हणाले की एअरलाइन प्रवाशांसाठी दुसर्‍या फ्लाइटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. विमान उड्डाण करणे अपेक्षित आहे, ते म्हणाले, सर्व प्रवासी सुरक्षित आहे.