प्रसूती गृहात दाखल बालकांची प्रकृती गंभीर होती; पालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

पालिकेच्या भांडूपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात १९ ऑगस्टपासून डंडियन पेडियाट्रिक प्रायव्हेट लि. या बाह्य संस्थेकडून २० एनआयसीयूची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या प्रसूतीगृहात जन्मलेल्या बाळांसाठी १० बेड तर बाहेरून अत्यवस्थरीत्या दाखल होणार्‍या बाळांसाठी १० बेड राखीव आहेत. यानुसार ही बालके दाखल करण्यात आली होती. यामध्ये १४ डिसेंबर रोजी दाखल झालेले बाळ २० डिसेंबर रोजी, १२ डिसेंबर रोजी २१ डिसेंबर रोजी, १५ डिसेंबरला दाखल झालेले बाळ २२ डिसेंबर रोजी आणि १६ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या बाळाचा आज मृत्यू झाला.

    मुंबई (Mumbai) :  गेल्या ३,४,५, १२,१४, १५ व १६ डिसेंबर रोजी अन्य मॅटनटी होम्स मधील बालके सावित्रीबाई फुले प्रसितीगृहात उपचारासाठी दाखल होते. या बालकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सावित्रीबाई फुले प्रसितीगृहात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मध्ये आधीपासून इन्फेक्शन असल्याने ते औषधालाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे चार बालकांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सायन रुग्णालयातील न्यूरोनाटल एचओडी प्रमुख ( बालरोग तज्ज्ञ) डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली त्रि सदस्यी समिती स्थापन केली असून पुढील ७ दिवसांत अहवाल येईल. त्यानंतर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

    २० बेड्सचे प्रसूतीगृह !
    पालिकेच्या भांडूपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात १९ ऑगस्टपासून डंडियन पेडियाट्रिक प्रायव्हेट लि. या बाह्य संस्थेकडून २० एनआयसीयूची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या प्रसूतीगृहात जन्मलेल्या बाळांसाठी १० बेड तर बाहेरून अत्यवस्थरीत्या दाखल होणार्‍या बाळांसाठी १० बेड राखीव आहेत. यानुसार ही बालके दाखल करण्यात आली होती. यामध्ये १४ डिसेंबर रोजी दाखल झालेले बाळ २० डिसेंबर रोजी, १२ डिसेंबर रोजी २१ डिसेंबर रोजी, १५ डिसेंबरला दाखल झालेले बाळ २२ डिसेंबर रोजी आणि १६ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या बाळाचा आज मृत्यू झाला. यामधील गंभीर बाळांमधील एका बाळाची वाढ पूर्ण वाढ झाली नव्हती, एकाचे वजन कमी होते, एकाला डायरिया तर एक अत्यवस्थ होते, अशी माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.