परमबीर सिंह यांच्यावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आरोप, मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला परमबीरांनी पाठिशी घातले.  निवृत्त एसीपी पठाण यांचा दावा

परमबीर यांनी कसाब आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या हँडलर्सना मदत केली आणि पुरावे मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पठाण यांनी केला आहे. माजी अधिकारी पठाण यांनी आरोपाचे  हे  चार पानी पत्र सध्याच्या मुंबई पोलीस आयुक्तांना पाठविले आहे.

  मुंबई – महाराष्ट्र पोलिसांचे (Maharashtra Police) निवृत्त एसीपी समशेरखान पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुंबईवर २६-११ ला झालेल्या हल्ल्यातील (Mubai 26/11 )प्रमुख आरोपी अजमल आमीर कसाब (Ajmal Kasab)याला परमबीर सिंह यांनी मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कसाबकडे मिळालेला फोन हा परमबीर सिंह यांनी स्वताच्या ताब्यात घेतला होता, आणि कोणत्याही तपास अधिकाऱ्याकडे हा फोन देण्यात आला नसल्याचे पठाण यांचे म्हणणे आहे. याच फोनवर पाकिस्तानातून कसाबला सूचना मिळत होत्या.

  परमबीर यांनी कसाब आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या हँडलर्सना मदत केली आणि पुरावे मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पठाण यांनी केला आहे. माजी अधिकारी पठाण यांनी आरोपाचे  हे  चार पानी पत्र सध्याच्या मुंबई पोलीस आयुक्तांना पाठविले आहे.

  पोलीस आयुक्तांच्या पत्रात दिला सर्व घटनाक्रम

  मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात समशेरखान पठाण यांनी त्यावेळी काय घडले, याचे सविस्तर विवेचन केले आहे. २००७ ते २०११ या कार्यकाळात पठाण हे पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस इन्सपेक्टर म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे बॅचमेट न आर माळी हे डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. दोघांचेही कार्यक्षेत्र हे मुंबई विभाग-२ मध्ये येत होते.

  कसाबकडून मिळाला होता मोबाईल

  २६-११ हल्ल्याच्या वेळी अजमल कसाबला गिरगाव चौपाटीवर अटक करण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर पठाण यांनी एन आर माळी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी कसाबकडून एक मोबाईल जप्त करण्यात आल्याचे माळी यांनी पठाण यांना सांगितले होते. त्यावेळी माळी यांनी सांगितले की, अनेक मोठे अधिकारी घटनास्थळी आले हेत, त्यात तत्कालीन एटीएस अधिकारी परमबीर सिंह यांचाही समावेश आहे. माळी यांच्या दाव्यानुसार, कसाबचा मोबाईल हा पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे होता, परमबीर यांनी त्याच्याकडून तो मोबाईल स्वताकडे घेतला आणि स्वताकडेच ठेवून दिला.

  या प्रकरणात कसाबचा मोबाईल फोन हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा होता. पाकिस्तानातून त्याला मिळणाऱ्या सूचना या याच मोबाईलवरुन मिळत होत्या. पाकिस्तान आणि भारतात असलेल्या कसाबच्या हँडलरमधील कनेक्शन या फोनद्वारे समोर आणता आले असते. यासाठी काही दिवसांनी पठाम यांनी माळी यांच्याशी पुन्हा चर्चा केली होती, आणि यात अधिक काही माहिती मिळते का, हे तपासायला सांगितले होते.

  फोन वेळेत दिला असता तर अनेकांचे प्राण वाचले असते

  अधिक चौकशी केली असता माळी यांनी असे संगितले की या प्रकरणाची चौकशी आता मुंबई क्राईम ब्रँच करीत असून, परमबीर यांनी कसाबचा मोबाईल क्राईम ब्रँचकडे सोपवलाच नाही. हा मोबील हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा होता, तो जर तपास यंत्रणांकडे सोपवला नसेल, तर ते शत्रुंना मदत करण्यासारखेच आहे. हा मुद्दा दोघांनीही उपस्थित केल्याचा  दावा पठाण यांनी केला आहे. या मोबाईलमध्ये पाकिस्तान आणि भारतातील दहशतवाद्यांच्या हँडलर्सचे नंबर असण्याची दाट शक्यता होती. या दहशतवादी कारवाईत सामील असणाऱ्या देशातील काही प्रभावशाली व्यक्तिंचे नंबरही या फोनमध्ये असण्याची शक्यता होती. हा फोन जर वेळेवर मुंबई क्राईम ब्रँचला देण्यात आला असता, तर अधिक महत्त्वाची माहिती जमा करण्याच्या स्थितीत पोलीस असू शकले असते. कारण त्यानंतरही सुमारे ६० तास हा हल्ला सुरुच होता.

  मोबाईल जप्त केल्याची बाब कधीच समोर आली नाही

  या हल्ल्यानंतर काही दिवसांनी इन्सपेक्टर माळी यांनी मुंबई दक्षिण विभागाचे आयुक्त व्यकटेशम यांची भेट घेऊन हा प्रकार संगितला होता.  हा फोन परमबीर यांच्याकडून घेऊन तो संबंधित तपास अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, अशी मागणीही माळी यांनी केली होती. ही माहिती माळी यांनीच दिल्याचे पठाण यांचा दावा आहे. आपण या खटल्यातील तपास अधिकारी नसल्याने याचा अधिकचा फॉलोअप आपण केला नाही, सेही पठाम यांनी लिहिले आहे. कसाबकडे मोबील सापडल्यायची माहिती, त्यानंतर कुठल्याच तपास यंत्रणा किंवा कोर्टात देण्यात आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

  मोबाईल तपास यंत्रणांकडे द्या असे सांगताच परमबीर भडकले.

  या महत्त्वाच्या पुराव्याबाबत चर्चा करण्यासाठी माळी तत्कालीन एटेस चिफ परमबीर यांना भेटले होते, त्यांनी हा पुरावा तपास यंत्रणांना द्यावा, अशी विनंतीही त्यांना केली होती. त्यावर परमबीर सिंह माळींवर भडकले होते. आपण सिनियर सल्याचे सांगत, त्यांनी माळी यांना झापले आणि ऑपिसातून हाकलून दिले होते. माळी यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असेही परमबीर यांनी त्यांना खडसावले होते. ही सगळी माहिती माळी यांनीच आपल्याला दिल्याचा दावा पठाण यांनी केला आहे.

  देशांच्या शत्रुंसोबत परमबीर सामील असल्याचा आरोप

  परमबीर आणि व्यंकटेशम यांच्याकडे विनंती करुनही काहीही न घडल्याने माळी हैराण झाले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणात वैयक्तिक तपास सुरुच ठेवला. कसाबच्या वैयक्तिक माहितीत त्याच्याकडे मोबाईल सापडल्याचा उल्लेखच त्यांना कुठल्याही कागदपत्रांत सापडला नाही. एक दहशतवादी मोबाईलविना एवढ्या मोठ्या हल्ल्याला कसा आकार देऊ शकेल, हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. याचा अर्थ असा होतो की, मोबाईल फोन मिळाला होता, पण तो तपास अधिकारी महाले यांच्यापर्यंत पोहचलाच नाही. यातून परमबीर सिंह हे शत्रुंसोबत काम करीत होते आणि त्यांनी पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला, हेच सिद्ध होते, असा आरोप पठाण यांचा आहे.

  या प्रकरणी योग्य तक्रार दाखल करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही निवृत्त एसीपी पठाण यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.