The builder will have no rights Land will be in the name of housing societies

राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नसल्याची दखल घेत राज्याच्या सहकार विभागाने सोसायटी नोंदवितानाच बांधकाम व्यावसायिकांकडून अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेयन्स) अत्यावश्यक कागदपत्रे घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे सोसायट्यांचा अभिहस्तांतरण करून घेण्याचा कायमचा त्रास संपुष्टात येणार आहे. सोसायट्यांनी कन्व्हेयन्स किंवा डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावे असे आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले असून याबाबत त्यांनी उपनिबंधकांना सूचनाही दिल्या आहेत(The builder will have no rights; Land will be in the name of housing societies).

  मुंबई : राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नसल्याची दखल घेत राज्याच्या सहकार विभागाने सोसायटी नोंदवितानाच बांधकाम व्यावसायिकांकडून अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेयन्स) अत्यावश्यक कागदपत्रे घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे सोसायट्यांचा अभिहस्तांतरण करून घेण्याचा कायमचा त्रास संपुष्टात येणार आहे. सोसायट्यांनी कन्व्हेयन्स किंवा डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावे असे आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले असून याबाबत त्यांनी उपनिबंधकांना सूचनाही दिल्या आहेत(The builder will have no rights; Land will be in the name of housing societies).

  कन्व्हेअन्ससाठीची आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी कन्व्हेअन्स करून नाही दिला. तर सोसायटीने केवळ अर्ज व सोसायटीचा ठराव दिल्यास ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ची (मानवी अभिहस्तांतरण) प्रक्रिया पूर्ण करून जमीन सोसायटीच्या नावावर केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

  बांधकाम व्यावसायिक सोसायटी नोंदवून सोसायटीचा कारभार सदनिकाधारकांकडे सोपवितात. सोसायटी नोंदविल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये कन्व्हेअन्स करून देणे आवश्यक असते. मात्र, कन्व्हेअन्स करून देण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जाते.

  सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिक कन्व्हेअन्स करून देत नसल्याने अनेक सोसायट्यांनी ‘डीम्ड कन्व्हेअन्स’चे अर्ज उपनिबंधकांकडे सादर केले जातात. त्यासाठी अत्यावश्यक असलेली कागदपत्रे गोळा करताना सदनिकाधारकांची तारांबळ उडते. अनेकदा बांधकाम व्यावसायिकांकडून कागदपत्रे देण्यास नकार दिला जातो. त्यामुळे आता बांधकाम व्यावसायिक हे सोसायटी नोंदविण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतली जाणार आहेत.

  बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येणार

  बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सोसायटीकडे हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून ही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने सहकार विभागाकडून ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ करून देण्यात येते. सोसायटीचे हस्तांरण न झाल्यास भविष्यात सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल, तर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळणे, हक्काचा पुरावा म्हणून मिळणारे प्रॉपर्टी कार्ड किंवा सदनिकेची खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. मात्र, डीम्ड कन्व्हेअन्स झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतात; तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येतो.

  आवश्यक कागदपत्रे

  •  नमुना 7 मधील अर्ज
  • गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/ कंपनी नोंदणी प्रमाणपत्र/डीड ऑफ डिक्लरेशनची प्रत.
  • विकासकाने मंजूर करून घेतलेल्या रेखांकनामध्ये (लेआउट) समाविष्ट असलेल्या सर्व्हे / गट नंबरचा 7/12 उतारा
  • प्रत्येक सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत
  • संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची यादी.
  • नियोजन प्राधिकरणाने प्रमाणित केलेले बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र