
, भारत बायोटेकने घोषणा केली होती की ते सरकारला प्रति शॉट 325 रुपये आणि खासगी लसीकरण केंद्रांना प्रति शॉट 800 रुपये या दराने लस विकतील.
नेझल कोरोना वॅक्सिन (nostril vaccine) म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीच्या वापराला परवानगी दिल्यानंतर आता iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लस लवकरच उपलब्ध होणार आहे. स्वदेशी लस उत्पादक भारत बायोटेक 26 जानेवारी रोजी देशातील आपल्या प्रकारची पहिली इंट्रानासल कोविड-19 लस Inovac लाँच करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी शनिवारी ही माहिती दिली.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, भारत बायोटेकने घोषणा केली होती की ते सरकारला प्रति डोस 325 रुपये आणि खासगी लसीकरण केंद्रांना प्रति डोस 800 रुपये या दराने लस विकतील. भोपाळमधील इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच, गुरांमधील लुम्पी त्वचारोगासाठी लम्पी-प्रोव्हाकिंड ही देशी लस पुढील महिन्यात लाँच करण्याची शक्यता असल्याचही ते म्हणाले. नेझल कोरोना वॅक्सिन कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नेझल कोरोना वॅक्सिन बूस्टर डोस म्हणून मान्यता
भारत बायोटेक कंपनीच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. भारत बायोटेकची इंट्रानेझल कोविड लसीचा पर्याय कोविन ॲपवरही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच ही नेझल कोरोनो वॅक्सिन खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यात येईल. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होईल