
कर्नाटकच्या सिरसी येथील हिपानाहल्लीमध्ये गाईने सोन्याची 20 ग्रॅमची साखळी गिळल्याची घटना घडली. यासाठी रोज सलग 35 दिवस सलग तपासले गाईचे शेण. शेवटी मेटल डिटेक्टरने याचा शोध घ्यावा लागला(The cow swallowed the gold chain).
बंगळुरू : कर्नाटकच्या सिरसी येथील हिपानाहल्लीमध्ये गाईने सोन्याची 20 ग्रॅमची साखळी गिळल्याची घटना घडली. यासाठी रोज सलग 35 दिवस सलग तपासले गाईचे शेण. शेवटी मेटल डिटेक्टरने याचा शोध घ्यावा लागला(The cow swallowed the gold chain).
श्रीकांत हेगडे यांच्याकडे एक चार वर्षाची गाई आणि तिचे वासरू आहे. दिवाळीनंतर त्यांनी गायीची पूजा केली. यासाठी त्यांनी गाईला आणि वासराला अंघोळ घातली आणि फुलेही वाहिली. काही लोक गाईला लक्ष्मीचे रूप मानतात. त्यामुळे तिला महागड्या दागिन्यांनी सजवले जाते. पुजेनंतर हे दागिने काढून घेतले जातात.
श्रीकांत हेगडे यांच्या कुटुंबीयांनी वासराला 20 ग्रॅमची सोन्याची साखली घातली. मात्र ही साखळी काढून घेतल्यानंतर त्यांनी ती फुले आणि इतर साहित्यासोबत गाईच्या समोरच ठेवली. नंतर सोन्याची साखळी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भरपूर शोधूनही साखळी मिळाली नाही. यामुळे त्यांनी असा अंदाज लावला की गाईनेच तिथे ठेवलेल्या फुलांसोबत साखळी गिळली असावी.
35 दिवस सलग तपासले शेण
यानंतर कुटुंबातील सदस्यांनी 30 ते 35 दिवस सलग गायीचे शेण तपासले. मात्र तरीही ही साखळी मिळाली नाही. अखेर मदतीसाठी ते पशुवैद्यकाकडे गेले. डॉक्टरांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीने तपासणी केली आणि सांगितले की गायीच्या पोटात धातू आहे. यानंतर पोटाचे स्कॅन करून हे शोधण्यात आले की साखळी नेमकी कुठे अडकली आहे.
कुटुंबीयांच्या विनंतीवरून शस्त्रक्रिया करून सोनसाखळी काढण्यात आली. या साखळीचे वजन 20 ग्रॅमवरून घसरून 18 ग्रॅम झाले होते. कारण त्यातील एक छोटासा भाग गायब आहे. मात्र त्यांची मौल्यवान साखळी मिळाल्याने कुटुंब आनंदी आहे. मात्र या सगळ्या वेदनांमधून गायीला जावे लागले याची त्यांना खंतही आहे.