संतापजनक! श्राद्धच्या जेवणात मिळालं नाही दही, संतापलेल्या तरुणानं कुटुंबीयांच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी, पोळलेले 8 जण ह़स्पिटलमध्ये

गरम पाणी अंगावर फेकल्यानं 8 जण पोळले आहेत. त्यानंतर तातडीनं त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र जखमा जास्त असल्यानं त्यांना सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

    बेगूसराय- श्राद्धच्या (Funeral Feast) पूजेनंतर वाढण्यात आलेल्या जेवणात दही वाढलं नाही, एवढ्याच्या शुल्लक कारणावरुन एका तरुणानं तमाशा केला. संतापलेल्या या तरुणानं हे जेवण वाढणाऱ्या कुटुंबावर उकळलेलं पाणी फेकलं. या कृत्यानं 3 महिलांसह 8 जण होरपळून निघालेत. गोंधळाच्या स्थितीतच या आठही जणांना सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय. सध्या या आठही जणांवर उपचार सुरु आहेत. बिहारच्या बेगूसरायमध्ये हा संतापजनक प्रकार समोर आलाय.

    इतका का संतापला हा तरुण ?

    बेगूसराय जिल्ह्यातील मूसराज गावात हा प्रकार घडला. राजेश साह या तरुणाच्या काकूचं मरणोत्तर श्राद्धविदी उरकण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना जेवण वाढण्यात आलं. या जेवणाच्या पंगतीत दही वाढण्यास उशीर झाला म्हणून आरोपीने आरडाोरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या आरोपीनं जेवायला बसलेल्या 6-7 जणमांना सोबत घएून राजेश साह यांच्या परिवारावर शिजत असलेल्या भाताचं पाणी फेकलं. या त्याच्या कृत्यानं पंगतीत एकच गोंधळ उडाला. या घटनेत राजेश साह यांची 14 वर्षांची मुलगी निशू, पत्नी द्रौपदी, बहीण जीवसी देवी, मुलगा प्रिन्स आणि पिंटू हे गंभीर जखमी झाले आहेत.

    उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल

    गरम पाणी अंगावर फेकल्यानं 8 जण पोळले आहेत. त्यानंतर तातडीनं त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र जखमा जास्त असल्यानं त्यांना सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी गरम पाणी फेकणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.