The dog gave birth to a green dog! Rare type that happened in Canada

सोशल मीडियावर आपण अनेक विचित्र व्हिडिओ आणि फोटो पाहत असतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा एका कुत्र्याच्या पिलाचा फोटो आहे. सोशल मीडियावर कुत्र्यांशी संबंधित हजारो फोटो आणि व्हिडिओ नेहमीच अपलोड होतात, यात वेगळे काय? या फोटोवर तुमचाही विश्वास बसणार नाही. एका कुत्रीने हिरव्या रंगाच्या कुत्र्याला जन्म दिला आहे. हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण कॅनडातील असून, या हिरव्या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे(The dog gave birth to a green dog! Rare type that happened in Canada).

    मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील एका बुलडॉगने 8 पिल्लांना जन्म दिला, त्यापैकी एकाचा रंग हिरवा आहे. या दुर्मिळ कुत्र्याचा मालक ऑड्रेने फेसबुक पोस्टवरुन याबद्दल माहिती दिली. ‘हिरवे पिल्लू पाहणे दुर्मिळ आहे. हा रंग छान दिसतो, तो तसाच राहावा अशी माझी इच्छा आहे’,असं तो म्हणाला.

    दरम्यान, कुत्र्याचा हिरवा रंग गर्भातील हिरवा पित्त बिलिव्हरडिनमुळे असू शकतो, अशी भीती कुत्र्याच्या मालकाला वाटत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ऑड्रेने सांगितले की, जेव्हा पिल्लाचा जन्म झाला तेव्हा त्याला विश्वास बसत नव्हता की असे होऊ शकते. मग त्याने कुत्र्याला थोडेसे घासले, पण तरीही हिरवा रंग जात नव्हता.

    मग मी गुगलवर शोधले आणि हे एक अत्यंत दुर्मिळ पिल्लू असल्याचे दिसून आले. या प्रकरणी डॉ.ब्राउनवेन क्रेन यांनी सांगितले की, अशी प्रकरणे 10,000 पैकी एक असू शकतात. मात्र, याआधी असा प्रसंग कधीच पाहिला नसल्याचेही त्यांनी सांगितले. असाच एक अहवाल 2020 मध्ये प्रकाशित होता, ज्यामध्ये जिप्सी नावाच्या पांढऱ्या जर्मन शेफर्डने हिरव्या कुत्र्याला जन्म दिला होता.