
२६ डिसेंबर ला साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला ३२वर्षीय इसम हा राज्यातील ओमीक्रॉनचा पहिला रूग्ण ठरला होता. प्रशासकीय यंत्रणेने दखल घेत कल्याणातील आर्ट गँलरीत उपचारार्थ ठेवले असता त्यांची प्रकुती स्थिर होती. अखेर बुधवारी त्यांची आरटीपीसीआर चाचणी अवहाल हा नेगेटिव्ह आल्याने ......
कल्याण (Kalyan) : साऊथ आफ्रिकेतुन आलेल्या डोंबिवलीतील रहिवाशी असलेल्या एका ३२ वर्षीय इसामाची कोरोना चाचणी केली असता तो कोरोना पाँझिटिव्ह आला होता. यानंतर त्यात ओमीक्रॉन विषाणूचे व्हेरियंट आढळल्याचा रिपोर्ट मिळल्याने एकच खळबळ उडाली होती.या घटनेने अनेकांची धस्ती वाढली होती. ८ डिसेंबर बुधवारी रोजी त्यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने केडीएमसीच्या आर्ट गँलरी कोरोना उपचार केन्द्रातुन उपचारा अंती रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
२६ डिसेंबर ला साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला ३२वर्षीय इसम हा राज्यातील ओमीक्रॉनचा पहिला रूग्ण ठरला होता. प्रशासकीय यंत्रणेने दखल घेत कल्याणातील आर्ट गँलरीत उपचारार्थ ठेवले असता त्यांची प्रकुती स्थिर होती. अखेर बुधवारी त्यांची आरटीपीसीआर चाचणी अवहाल हा नेगेटिव्ह आल्याने प्रकुती ठीकठाक असल्याने रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या आनंदात भर पडली असुन ओमायक्रानचा पेशंटने आजारावर मात केल्याची राज्यातील पहिली दिलासादायक घटना आहे. तसेच त्याला सात दिवस होम आयसोलेशन मध्ये राहावे लागणार असल्याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.