सातारा जिल्ह्यातील पहिले ‘व्हॅक्सिन व्हेईकल’ महाबळेश्वरला

पाचगणी येथील जागतिक दर्जाचे आरोग्य मंदिर बेल एअर कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोना हॉस्पिटल, पाचगणी आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने व्हॅक्सिन वाहन (Vaccine Vehicle) उपलब्ध करण्यात आली आहे.

    सातारा : पाचगणी येथील जागतिक दर्जाचे आरोग्य मंदिर बेल एअर कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोना हॉस्पिटल, पाचगणी आणि टाटा मोटर्स यांच्या वतीने व्हॅक्सिन वाहन (Vaccine Vehicle) उपलब्ध करण्यात आली आहे.

    दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील पहिली कोरोना व्हॅक्सिन वाहन महाबळेश्वर तालुक्याला मिळाले आहे. तालुक्यातील अपंग, वयोवृद्ध नागरिकांचे लसीकरण सुलभ होणार आहे. व्हॅक्सिन वाहन महाबळेश्वर तालुक्याच्या दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी हे वाहन संजीवनी ठरणार आहे. त्याचा प्राधान्याने काळजीपूर्वक वापर होणार आहे.

    याचा शुभारंभ महाबळेश्वर पंचायत समिती सभापती व युवा नेते संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. अठरा वर्षांवरील सर्वांनीच राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लसींचे दोन्ही डोस घावे असे आवाहन देखील करण्यात आले.

    याप्रसंगी महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी टाटा मोटर्स व बेल एअरचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

    महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी-तापोळा-महाबळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. त्यांचे ही लसीकरण सुलभ होण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष मालुसरे, रिपब्लिकन पक्षाचे एकनाथ रोकडे, महारुद्र तिकुंडे यांनी केली. महाबळेश्वर तालुक्याला व्हॅक्सिन वाहन दिल्याबद्दल दोन्ही संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.