बोरे वेचायला आलेल्या मुलीला घरात नेले अन् केले अश्लील चाळे; दोन्ही मुलींना धमकी

एका ७४ वर्षीय वृद्ध व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

    चंद्रपूर (Chandrapur) : एका ७४ वर्षीय वृद्ध व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

    आजोबांच्या वयाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथे घडली आहे. या घटनेमुळं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियेनंतर पोलिसांनी या वृद्ध व्यक्तीस अटक केली आहे.

    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, वृद्ध आरोपीने गावाशेजारील बोरे वेचत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने जवळच असलेल्या एका घरात नेऊन अत्याचार केला. याबद्दल कुणाला सांगितलं तर जिवे मारण्याची धमकी दिली. ऐवढ्यावरच तो थांबला नाही तर, ज्या घरात त्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. त्या घरातील मुलीवरही बळजबरी केली. व या दोन्ही मुलींना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने दोन्ही मुलींना धमकी दिल्यामुळं दोघींही धास्तावल्या होत्या. ही घटना १७ डिसेंबरला घडली.

    या घटनेने दोन्ही मुली मानसिकरीत्या खचल्या होत्या. दोन-तीन दिवस अबोला धरलेल्या मुलींना बघून वडीलांना शंका आली. आई बाहेरगावी गेली होती. वडीलांनी पत्नीला बोलावून घेतले. त्यानंतर आईने दोन्ही मुलींना बोलत केल्यानंतर आई जवळ मुलीने घडलेला प्रकार सांगितला. ही घटना ऐकून मुलींचे पालक हादरले. दोन्ही मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (१ए), ३७६ (एबी), ५०६ सहकलम ४, ६, १० बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आर. बी. मेढे, पूनम पाटील करीत आहेत.