सरकारने कामं केली नाही, म्हणून त्यांना नकला कराव्या लागतात : रावसाहेब दानवे

तसेच ओमीक्रॉन संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे. कोविड नियम अजूनही रेल्वे प्रशासनाने शिथिल केले नाही. केंद्र सरकारच्या नियमांचे पालन या ओमीक्रॉनच्या बाबतीत करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    अकोला (Akola) : राज्य सरकारने आपल्या कार्यकाळात विकासाची कामे केली नाही. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे, असा टोला केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला. ते अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

    उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून ते मंत्रालयात कितीवेळा गेले हे पहिले पाहिजे, असा टोला त्यांनी लावला आहे. हे काही पहिल्यांदा झाले नाही. परंतु, त्यांची प्रकृती चांगली होवो, ही प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.

    तसेच ओमीक्रॉन संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे. कोविड नियम अजूनही रेल्वे प्रशासनाने शिथिल केले नाही. केंद्र सरकारच्या नियमांचे पालन या ओमीक्रॉनच्या बाबतीत करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    तसेच बडनेरा येथील रेल्वे कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा खासदार नवनवीन राणा करीत आहे, असे म्हणत असाल ते मला माहिती नाही. परंतु, त्या कारखान्याला भेट देणार असल्याचे ते म्हणाले.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले होते की मी महाराष्ट्रात संप होऊ देणार नाही. परंतु, हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा मिटविण्यात अपयशी ठरले आहे. तसेच हे सरकार मराठा, ओबीसी आरक्षण, तसेच परीक्षांमध्ये भ्रष्टाचार करीत आहे. या भ्रष्टाचाराची तपासणी सीबीआयकडून होणे आवश्यक आहे. कारण हा भ्रष्टाचार कोणी एकाने केला नाही. या पाठीमागे सरकारमधील नेते तसेच अधिकारी ही सहभागी असू शकतात, असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.