महाराष्ट्र सरकारतर्फे राज्याच्या ईव्ही धोरणासोबत भागीदारीसाठी आदरातिथ्य क्षेत्राला प्रोत्साहन

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे (Tourism and Environment Minister Aditya Uddhav Thackeray) यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत (EV Vehicles) शॅलेट हॉटेल्स लिमिटेडच्या (Chalet Hotels Limited) बांधिलकीचे आणि ते हाती घेत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आणि आदरातिथ्य क्षेत्रातील अन्य कंपन्यांनी याचे अनुसरण करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.

  • शॅलेट हॉटेल्सच्या ईव्ही उपक्रमातील नेतृत्वाचे कौतुक

मुंबई : राज्य सरकारने वर्ष २०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या वाहनांच्या ताफ्यातील १५% वाहने इलेक्ट्रिक वाहनांत (‘ईव्ही’) परिवर्तीत करण्याचा आणि त्याच जोडीने राज्याला बटरी संचलित वाहनांचा पहिल्या क्रमांकाचा उत्पादक बनविण्याचा मानस असणारे अत्यंत समन्वित असे ईव्ही धोरण (EV Policy) सादर केल्यानंतर; या धोरणासोबत सहयोग करण्यासाठी कॉर्पोरेट्स (Corporates) पुढे येत असल्याने हे सर्व धोरण प्रत्यक्षात उतरविण्याच्या दृष्टीने होणाऱ्या प्रयत्नांना आता वेग येऊ लागला आहे.

मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे (Tourism and Environment Minister Aditya Uddhav Thackeray) यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत (EV Vehicles) शॅलेट हॉटेल्स लिमिटेडच्या (Chalet Hotels Limited) बांधिलकीचे आणि ते हाती घेत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आणि आदरातिथ्य क्षेत्रातील अन्य कंपन्यांनी याचे अनुसरण करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी अशी इच्छा उत्कटतेने व्यक्त केली की आदरातिथ्य क्षेत्राने आपल्या स्थानीय चार्जिंग कारभारात अधिक वाढ करावी आणि वाहन तंत्रज्ञान क्षेत्राच्या संयोगाने व सहाय्याने आपल्या हॉटेल्स तसेच अन्य ठिकाणी पाहुण्यांना उत्तम सुधारित अनुभूती मिळवून देण्याच्या दृष्टीने चार्जिंग स्टेशन्सची (Charging Stations) उभारणी करावी.

शॅलेट हॉटेल्सच्या शाश्वतता बांधिलकीमध्ये वर्ष २०२५ पर्यंत ताफ्यातील सर्व १००% वाहने ‘ईव्ही’मध्ये परिवर्तीत करण्याचा समावेश असून ही बांधिलकी फक्त तेवढ्यापुरती नाही; तर आपल्या पोर्टफोलिओमधील सर्व हॉटेल्समध्ये तसेच व्यावसायिक ऑफिस स्पेसच्या ठिकाणीही ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची स्थापना करण्याचा देखील त्यामध्ये समावेश आहे. यामुळे व्यापक स्तरावर लोकसंख्येला ईव्ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी प्रभावित आणि प्रोत्साहित करण्याची शॅलेट हॉटेल्सला संधी मिळू शकेल आणि त्यायोगे बहुदा त्यांना ही वाहने वापरण्यामध्ये देखील परावर्तीत करणे शक्य होईल. या वर्षाच्या सुरवातीलाच क्लायमेट ग्रुपच्या परिवर्तनीय विद्युत, उर्जा कार्यक्षमता आणि इलेक्ट्रिक वाहने यांना अनुक्रमे निगडीत असलेल्या आरई१००, ईपी१०० आणि ईव्ही१०० या उपक्रमांशी बांधिलकी दर्शविणारी शॅलेट हॉटेल्स ही जागतिक पातळीवरची पहिली आदरातिथ्य कंपनी बनली आहे.

या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्याचे समन्वित ईव्ही धोरण ईव्ही उत्पादन आणि उपयोग यासाठीचे सर्वात आघाडीचे स्थान म्हणून महाराष्ट्र राज्याला नावारूपाला आणण्याच्या दृष्टीने विकसित करण्यातआलेले आहे. प्रमाणित कामकाज पद्धती (एसओपी), पायाभूत सुविधा आदेश आणि प्रोत्साहनपर वातावरण यांच्या आधारे आम्ही राज्यामध्ये ‘ईव्ही’चा व्यापक पातळीवर वाढता स्वीकार होईल अशी अपेक्षा बाळगून आहोत. या धोरणाचा जोरदार कार्यान्वय होणे अतिशय महत्वाचे असून खासगी क्षेत्राचा पाठींबा असल्याखेरीज हे धोरण संपूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही. शॅलेट हॉटेल्सने खूप चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे आणि आदरातिथ्य क्षेत्रातील तसेच अन्य क्षेत्रातील आणखी कॉर्पोरेट्सनी आवश्यक त्या उपयोजना घेऊन पुढे येण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितो.”

या प्रसंगी बोलताना शॅलेट हॉटेल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी म्हणाले, “माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सुयोग्य वेळेत अत्यंत आवश्यक असलेले ईव्ही धोरण सादर केले याबद्दल आम्ही त्यांची मनापासून वाखाणणी करतो. वातावरणातील बदलांबाबतची विस्तृत स्तरावर असलेली ध्येय-उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये हे धोरण अतिशय कळीची समतोल भूमिका बजावणार आहे. शॅलेटमध्ये आम्ही आमच्या प्रकल्पांचा पर्यावरणावर काय परिणाम घडून येईल याबाबत अतिशय विचारपूर्वक पावले उचलत असतो आणि त्यानुसार अत्यंत काटेकोरपणे आमच्या शाश्वतता कार्यक्रमांची आखणी करत असतो. लिननचा फेरवापर करणे, पाण्याचे रिसायकलिंग करून वापरणे, पाण्याची बचत करणे आदी उपक्रमांच्या रूपाने आपल्या पाहुण्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आदरातिथ्य क्षेत्राचा आजवरचा इतिहासच आहे. आपल्या ग्राहकांना ईव्हीची अनुभूती मिळवून देऊन तसेच त्यांना शक्यतोवर ईव्हीचा वापर करण्यात परिवर्तीत करून ईव्हीच्या अद्याप दुर्लक्षित असलेल्या बाजारपेठेमध्ये भक्कमपणे उभे राहण्याच्या अनोख्या परिस्थितीचा लाभ आजचे हॉटेल व्यावसायिक घेऊ शकणार आहेत. आगामी काळात शाश्वतता आराखड्याशी निगडीत अन्य उपक्रमांसाठी देखील महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी पाठींबा देणे आम्हाला शक्य व्हावे अशी आमची मनीषा आहे.”

पर्यावरणाला लाभ मिळवून देणाऱ्या, ग्राहकांवर प्रभाव प्रतिक्षिप्त पडणाऱ्या आणि मूळ उद्देशावर प्रभाव पाडणाऱ्या पर्यावरणपूरक व्यावसायिक कार्यात हॉटेल व्यावसायिकांनी गुंतवणूक केलेली आहे. सोलर तंत्रज्ञानासारख्या इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन्सचा अंगीकार केल्याने ग्राहकांच्या विस्तारित अपेक्षांना प्रतिसाद देतानाच या तिन्ही उद्दिष्टंना पाठबळ देणे शक्य होणार आहे.

आपल्या अन्य शाश्वतता उपक्रमांमध्ये आपल्या कार्बन फूटप्रिंटवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि ऑटोमेशनच्या सहाय्याने इलेक्ट्रिसिटी व पाणी वापरात बचत घडवून आणण्यासाठी शॅलेट हॉटेल्स लक्षणीय बेंचमार्क प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत आहे. शून्य टक्के सांडपाणी बाहेर टाकले जाईल याची शॅलेट पोर्टफोलिओमधील सर्व हॉटेल्स पूर्ण दक्षता घेतात आणि एकेरी वापराचे प्लॅस्टिक व कागद यांचा वापर कमीतकमी करण्यासाठी ही सर्व हॉटेल्स बांधील आहेत. आपल्या पोर्टफ़ोलिओतील सर्व हॉटेल्समध्ये उर्जा कार्यक्षम उपकरणांमध्ये, ऑटोमेशनमध्ये आणि अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करून कंपनीने आपला एकूण उर्जेचा वापर कमी करून दाखवला आहे.