माझ्या पराभवामागे ‘या’ नेत्याचा हात, मोठं षडयंत्र रचुन मला पाडलं; शशिकांत शिंदे यांची जोरदार टीका

    सातारा : राज्याच्या सहकाराचा केंद्रबिंदू म्हणून राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना ओळखण्यात येतं. नुकतंच विविध जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांचा निकाल घोषित झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची सहकारी बॅक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ओळखण्यात येतं. सातारा जिल्हा बॅंकेवरून राज्यात जोरदार राजकीय कलगीतूरा रंगला आहे.

    सातारा बॅंकेच्या निवडणुकीत साताऱ्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते शशिकांत शिंदे यांना अवघ्या एका मतानं पराभूत व्हावं लागलं आहे. शिंदे यांना त्यांच्याच गडात सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे.

    दरम्यान शशिकांत शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत व्यक्तींवर शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केल्यानं राज्यात खळबळ माजली आहे.

    शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले? 

    आमदार शिवेंद्रराजे यांनीच माझ्या पराभवासाठी काम केलं, असं शिंदे म्हणाले आहेत. साताऱ्याच्या राजकारणात शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात खुपदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निकालात दिग्गजांना पराभवाचा झटका बसला आहे. शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात शिंदे यांची भेट घेतली होती.