इतर राज्यातील युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल; विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण

गोव्यात कॉंग्रेसला आत्मविश्वास नडणार असून, गोव्यात कॉंग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याच्या  संजय राऊत यांच्या टिकेचा वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत समाचार घेतला. ते भंडाऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते.

    मुंबई : आमची युती फक्त महाराष्ट्रात आहे, इतर राज्यातील युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल. येणारी निवडणूक ठरवेल कोणाला किती जागा द्यायच्या, असा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

    दरम्यान गोव्यात कॉंग्रेसला आत्मविश्वास नडणार असून, गोव्यात कॉंग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याच्या  संजय राऊत यांच्या टिकेचा वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत समाचार घेतला. ते भंडाऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते.

    वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? 

    संजय राऊत यांचे एक अंकी आमदार  हे वक्तव्य त्यांच्या शिवसेना पक्षाशी संबधित असल्याचे वड्डेट्टीवार यावेळी म्हणाले. शिवसेनेला UPA मध्ये समाविष्ट करून घेण्यासंबधी लोकसभेच्या निवडणुका लागताच कांग्रेस हायकमांड निर्णय घेईल.  संजय राऊत यांच्या कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भेटीगाठी होत असून लवकर शिवसेनेचा UPA मध्ये समाविष्ट होणार असल्याचा विश्वासही यावेळी विजय वड्डेट्टीवार यांनी व्यक्त केला.