सुखी संसाराला संशयाची दृष्ट! पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करुन मृतदेहाचे 20 तुकडे करुन फेकले कालव्यात

एका घावात त्याने अक्षयची मान कापली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले. 20 पेक्षा जास्त तुकडे केले. हात, पाय, मान वेगळे केले. धडाचेही अनेक तुकडे झाले अशी माहिती त्याने पोलिसांना दिली

  गाझियाबाद :गाझियाबादच्या खोडा येथे हत्येची एक धक्कादायर घटना उघडकीस आली आहे. येथे एका रिक्षाचालकाने पत्नीच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने गळागळा ( wife’s lover murder) चिरून खून केला आणि मृतदेहाचे 20 तुकडे करून कालव्याच्या काठावरील झुडपात गोण्यांमध्ये फेकून दिले होते. मीलाल (३४) असे आरोपीचे नाव आहे. प्रियकर अक्षय (२४) असे मृतकाचे नाव आहे.

  नेमकं काय झालं?

  मूळचे संभळचे रहिवासी असलेले मीलाल प्रजापती हा पत्नी आणि मुलीसोबत खोडा येथील आदर्श नगर येथील सोम बाजार येथे भाड्याने राहतो. राजस्थानच्या कोटपुतली येथे राहणारा अक्षय हादेखील सुमारे दोन वर्षांपूर्वी मिलालच्या शेजारी राहत होता. या दरम्यान, मीलालची पत्नी पूनमची अक्षयसोबत जवळीक वाढली. अक्षय दोन वर्षांपूर्वी राजस्थान परतला होता, पण मिलालच्या पत्नीशी संपर्कात असल्याची माहिती मिलाल कळली. ही बाब त्याला रुचली नाही.  त्यामुळे त्याने  अक्षयचा काटा काढण्याचे ठरवले.

  कशी केली हत्या?

  काही दिवसांपूर्वी त्याची सात वर्षांची मुलगी रेखा घरी जळाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर (जीटीबी) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूनमला रुग्णालयात  मुलीकडे लक्ष ठेवण्यास जाव लागत होतं. त्यामुळे त्याने पत्नीला काही दिवसांसाठी अक्षयला राजस्थानहून फोन करुन येण्यास सांगितले. पत्नीने त्याच्या बोलण्यावर येऊन अक्षयला फोनवर बोलावले. १९ जानेवारीला सकाळी तो पोहोचला. शुक्रवारी संध्याकाळी पूनम रुग्णालयात  मुलीकडे गेली असता मीलालने रात्री झोपेत अक्षयची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे कुऱ्हाडीने 10 हून अधिक तुकडे करून मृतदेह पोत्यात भरून सोमबाजार पुष्टे रोडवरील इंदिरापुरम अंडरपासजवळ फेकून दिले.

  एकाच घावात मान वेगळी

  मीलाल पोलिसांना सांगितले की, आपण कटानुसार सर्व तयारी केली होती. घरात आधीच कुऱ्हाड आणली होती. योग्य संधीची वाट पाहत होतो. त्याने पूनमला आपल्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात जाण्यास सांगितले. ती निघून गेली. दोन मुली आणि अक्षय घरीच राहिले. रिक्षा चालवून तो परत आला असता अक्षय घरी आढळून आला. यानंतर अक्षय झोपी गेला. मुलं त्याच खोलीत झोपली होती. तो फक्त जागा राहिला. रात्री अकरा वाजता त्यांनी पाहिले की, मुली झोपल्या आहेत. अक्षयही झोपला आहे. तो कुऱ्हाडीने  सर्व शक्तीने त्याच्या मानेवर वार केला.

  मृतदेहावर 20 हून अधिक वार

  एका घावात त्याने अक्षयची मान कापली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले. 20 पेक्षा जास्त तुकडे केले. हात, पाय, मान वेगळे केले. धडाचेही अनेक तुकडे झाले. मुलांना हे माहीत नव्हते. सकाळी उठल्यावर त्याने मुलांना सांगितले की काका रात्रीच घरी परतले आहेत, त्यांना काही महत्त्वाचे काम आहे.