नरभक्षक वाघ सिमेंट पाईपमध्ये अडकला; बघ्यांची तोबा गर्दी

    पोंभुर्णा (Pombhurna) :  तालुक्यात धूमाकूळ घालणाऱ्या वाघाने आज शेतात बकरीची शिकार केली. शिकारीवर ताव मारीत असतांनाच शेतकरी धावले. या लगबगीत वाघाने धूम ठोकली मात्र सिमेंटचा पाईपमध्ये वाघ अडकला. याची माहीती पसरताच शेकडो नागरिकांनी वाघाला बघण्यासाठी गर्दी केली.

    पोंभुर्णा-गोंडपिंपरी मार्गावरील चेक-आष्टा येथे झालेल्या गर्दीमुळे काही वेळासाठी वाहतुक ठप्प झाली. वनविभाग, पोलीस विभागाने घटनास्थळ गाठले. वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.