
आज उपोषणाच्या १४ व्या दिवशी जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. सकळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "मराठा समाजाने राजकीय पक्षांना आत्तापर्यंत भरभरून दिलं आहे, आत्ता त्याची परतफेड करण्याची वेळ आहे. आता कोणते पक्ष आमच्या पाठी उभे राहतात ते पाहू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जालना : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील १४ दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे उपोषणला बसले आहेत. जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटताहेत. दरम्यान, सरकारने मराठवाड्यातील निजामच्या काळात ज्यांच्या दाखल्यावर कुणबी असा उल्लेख आहे, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. पण सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली असून, यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाने सरकारसोबत चर्चा केली. जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांना सरकारने सुधारणा करुन दिली. मात्र सुधारणा केलेल्या जीआरनतर देखील जरांगे हे समाधानी नाहीत. त्यामुळ उपोषण आणखी तीव्र होणार असून, आज मुंबईत आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. यातून तरी तोडगा निघणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले असताना, जरांगे-पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (manoj jarange patil insists on hunger strike will there be a solution from the all party meeting in mumbai today)
उपचार नकोत, मला न्याय हवा…
पुढे बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद आहे. मला उपचार नकोत, मला न्याय हवा आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. दुसरीकडे आज सर्वपक्षीय बैठक मुंबईत होत आहे, यातून काही तोडगा निघणार का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. राजकीय पक्षांचं मराठा समाजावर किती प्रेम आहे, ते आता समजेल, असं ते म्हणाले. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे कायम आहेत.
त्याची आता परतफेड करण्याची वेळ आलेय
दरम्यान, आज उपोषणाच्या १४ व्या दिवशी जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. सकळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाने राजकीय पक्षांना आत्तापर्यंत भरभरून दिलं आहे, आत्ता त्याची परतफेड करण्याची वेळ आहे. आता कोणते पक्ष आमच्या पाठी उभे राहतात ते पाहू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. दुसऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी आमच्यावर किती दिवस अन्याय करणार? असं जरांगे-पाटील म्हणाले.
येथे येऊ नका…, गावातच लढा उभारा
दुसरीकडे जालनातील या आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटताहेत, जालन्यातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज ठाण्यात सकल मराठा समाजने बंदचा इशारा देण्यात आला. तसेच काल मुंबईत सकल मराठा समाजाने मोर्चा काढला. ग्रामस्थांनी या ठिकाणी जालन्यात न येता, गावागावात आरक्षणाची माहिती रॅलीच्या माध्यमातून पटवून द्यावी. या दरम्यान जनजागृतीही करावी, गावातच लढा उभारा, असे आवाहन जरांगे यांनी केले.
पाणी त्याग…, तर सलाईनही काढले