पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या आकुर्डीतील कै. ह.भ.प प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयात 10 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि 40 खाटांचा विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या आकुर्डीतील कै. ह.भ.प प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयात 10 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि 40 खाटांचा विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

    पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड घटली होती. रुग्णसंख्या 10 च्या आतमध्ये आली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून पुन्हा शहरातील रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. आज एकाचदिवशी 197 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यात सुदैवाची बाब म्हणजे घरीच उपचार घेणा-या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. लक्षणे विरहित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मृत्यूचेही प्रमाण नाही, ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

    रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. वैद्यकीय विभागाने सुविधा उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. आकुर्डीतील कै. ह.भ.प प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयात 10 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि 40 खाटांचा विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. कोरोना बाधित रुग्णांना आकुर्डीतील रुग्णालयात दाखल होण्यासाठी महापालिकेच्या इतर रुग्णालयांकडून संदर्भ चिठ्ठी घेणे आवश्यक असेल. तसेच गरजेनुसार खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे.