The risk of corona increased; Municipal Engineers' demand to postpone biometrics of municipal employees and engineers

ओमायक्रॉन विषाणूच्या सध्याच्या वाढत्या संख्येच्या परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता,कर्मचाºयांना जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रीक प्रणालीव्दारे उपस्थिती नोंदविण्याची पध्दत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.ती आणखी पुढे ढकलण्यात यावी व वातावरण स्थिर झाल्यानंतर बायोमेट्रिक उपस्थितीचा विचार करावा. अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याकडे केली आहे(The risk of corona increased; Municipal Engineers' demand to postpone biometrics of municipal employees and engineers).

    मुंबई : ओमायक्रॉन विषाणूच्या सध्याच्या वाढत्या संख्येच्या परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता,कर्मचाºयांना जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रीक प्रणालीव्दारे उपस्थिती नोंदविण्याची पध्दत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.ती आणखी पुढे ढकलण्यात यावी व वातावरण स्थिर झाल्यानंतर बायोमेट्रिक उपस्थितीचा विचार करावा. अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याकडे केली आहे(The risk of corona increased; Municipal Engineers’ demand to postpone biometrics of municipal employees and engineers).

    कोविड,१९ च्या साथ रोगात महानगर पालिकेतील बायोमेट्रीक प्रणालीव्दारे उपस्थिती नोंदवण्याची पध्दत स्थगित करण्यात आलेली आहे. ती पुर्ववत चालू करण्यासाठी एक परिपत्रक पालिका प्रशासनाने प्रसृत केलेले आहे. मुंबई महानगर आणि परिसरातील कोविड,१९ साथ रोगातील रुग्णांना उपचार देण्याचे कार्य रुग्णालयातील डॉक्टर,परिचारिका गेली दोन वर्ष उत्तम प्रकारे केलेले आहे.तसेच कोविड१९ संबंधित अन्य व्यवस्था पाहण्याचे काम महानगरपालिकेचे अभियंते आणि कर्मचारी आजही करत आहेत.

    मुंबई विमानतळ ,जम्बो कोविड सेंटर , महागनरपालिकेची सर्व रुग्णालये आणि विभागस्तरावर महानगरपालिकेचे अभियंते व कर्मचारी काम करत आहेत.सध्या ओमायक्रॉन विषाणू साथ रोगातील रुग्णांची मुंबई आणि महाराष्टÑातील वाढती संख्या ही अत्यंत चिंताजनक बाब असून महानगरपालिका प्रशासनाने मुंबई विमानतळ व गर्दीची ठिकाणे तसेच जम्बो कोविड सेंटर व अन्य ठिकाणी महानगरपालिकेतील अभियंते व कर्मचारी यांची नेमणूक करण्यास सुरूवात केलेली आहे.

    अभियंत्यांवर अभियांत्रिकी कामाचा आधीच खूप ताण आहे. त्याचा येथे विचार व्हावा .
    ओमायक्रॉन विषाणू साथ रोगाची सध्याची अनिश्चित परिस्थिती पाहता महानगरपालिकेतील बायोमेट्रीक प्रणालीव्दारे उपस्थिती नोंदविण्याची पध्दत पुढे ढकलण्यात यावी आणि ओमायक्रॉन विषाणूबाबतचे वातावरण स्थिर झाल्यानंतर बायोमेट्रीक उपस्थितीचा विचार करावा अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.