माझ्या मतदार संघातील रस्ते ओम पुरीच्या गालासारखे होते, ते आता हेमा मालिनीच्या गालासारखे केलेत; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राला शिकवता?’, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते. मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलताना त्यांचा रोख एकनाथ खडसे यांच्याकडे होता. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

    जळगाव : राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जोरदार कलगितुरा रंगला आहे. शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात आता खटके उडायला सुरवात झाली आहे.

    गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? 

    माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राला शिकवता?’, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते. मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलताना त्यांचा रोख एकनाथ खडसे यांच्याकडे होता. गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. माझे 30 वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावे की मी काय विकास केला आहे. असे ते म्हणाले.

    हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी केले आहेत. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही गुलाबराव पाटलांनी भाष्य केले आहे.

    मुंडक शिवसेनेचे कंबर भाजपची आणि पाय राष्ट्रवादीचे कुठे चालले आहे हे. यामध्ये बदल व्हायला हवा सर्व एकच असायला हवे. राज्यात पालकमंत्री शिवसेनेचा, नगर विकास मंत्री शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा असेच व्हायला हवे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.