सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या पडक्या अवस्थेत

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळा च्या ‎पत्र्याच्या इमारती असून‎ जीर्ण झाल्या आहेत. या शाळेच्या ‎ इमारतींच्या भिंतीला जागोजागी तडे गेले ‎ असून फरशी उखडून खड्डे पडले‎ आहेत. पत्रेही अनेक ठिकाणी जीर्ण‎ झाले असून पावसाळ्यात वर्गखाेल्या ‎‎ गळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे हाल ‎हाेतात.

    औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळा च्या ‎पत्र्याच्या इमारती असून‎ जीर्ण झाल्या आहेत. या शाळेच्या ‎ इमारतींच्या भिंतीला जागोजागी तडे गेले ‎ ‎ असून फरशी उखडून खड्डे पडले‎ अाहेत. पत्रेही अनेक ठिकाणी जीर्ण‎ झाले असून पावसाळ्यात वर्गखाेल्या ‎‎ गळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे हाल ‎हाेतात. जीव धाेक्यात घालून मुलांना ‎ज्ञानार्जन करावे लागते. जर‎ पावसाळयात जीर्ण खाेली पडून अपघात ‎ ‎होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    शाळेच्या परिसरात उंदीर घुशीनि मोठ्या प्रमाणत धुमाकूळ घातला असून, जमिनी खाली मोठ्या प्रमाणत पोखारल्याने वर्ग खोल्यातील फारश्या खचल्या आहेत.तर काही ठिकाणी मोठ मोठे नळे पडले आहे. या नळ्यातून नेहमी साप निघत असल्याने विध्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ‎ सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.