वडगाव बाजार समितीत आघाडीचा धुव्वा; सेवा सोसायटी गटात १८ जागांवर सत्ताधारी विजयी 

वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी महाडिक यांच्या समझोता एक्सप्रेसच्या शाहू आघाडीने सर्वच १८ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडविला. आज (बुधवारी) महालक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. महाडिक, कोरे, आवाडे, शेट्टी यड्रावकर मिणचेकर यांच्या एकत्रित गटाचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत.

    पेठ वडगाव : वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी महाडिक यांच्या समझोता एक्सप्रेसच्या शाहू आघाडीने सर्वच १८ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडविला. आज (बुधवारी) महालक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. महाडिक, कोरे, आवाडे, शेट्टी यड्रावकर मिणचेकर यांच्या एकत्रित गटाचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीने तालुक्यातील मातब्बर नेत्यांच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन दिलेल्या लढतीत पराभव झाला असला तरी मिळालेली मते सत्ताधाऱ्यांना आत्मचिंतन करावयास लावणारी आहेत.

    संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीकडे माजी आमदार महाडिक व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राजकीय वर्चस्ववादाची किनार होती. सतेज पाटील गटाकडून अनेक पराभवानंतर महाडिक यांच्या होम पीचवरील व गेली ३० वर्षे ताब्यात असलेल्या वडगाव बाजार समितीत परिवर्तन करण्याच्या इराद्याने सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार राजू बाबा आवळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऐनवेळी अपुऱ्या साधनांसह ‘लगाण ‘ टीम तयार करून जोरदार ताकत लावली. मात्र, महाडिक गटाची मजबूत संस्था गटावरील पकड आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, यड्रावकर, राजू शेट्टी, हळवणकर, डॉ. मिणचेकर यांच्या समझोता एक्स्प्रेसच्या माध्यमातून सतेज पाटील यांची जिल्ह्यात सुरु असलेली विजयी घोडदौड महाडिक यांनी घरच्या मैदानावर रोखली.

    विजयी निकालानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला आहे. तर शिरोली पंपावर जल्लोष करत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या.

    विजयी उमेदवारांची नावे : 

    इंगवले किरण जयसिंगराव

    खानविलकर विलास बाबासो

    डिग्रजे आण्णासो बंडू

    पाटील जगोंडा लक्ष्मण

    पाटील शिवाजी पांडुरंग

    पाटील सुरेश तात्यासो

    बोराडे बाळकृष्ण गणपती

    चौगुले भारती रावसो

    नरंदेकर वैशाली राजेंद्र

    चव्हाण सुनिता मनोहर

    मुजावर चाँद बाबालाल

    डावरे धुळगोंडा आण्णासो

    मगदूम राजू उर्फ अभयकुमार आप्पासो

    कांबळे नितीन पांडुरंग

    खोत वसंतराव शामराव

    मुसळे सागर सुनिल

    चव्हाण नितीन विष्णू

    असे विजयी ऊमेदवार आहेत. आज सकाळपासून १० टेबलवर ५० कर्मचारी यांच्या मदतीने तालुका संस्था उपनिबंधक डॉ. प्रगती बागल यांनी व मकसूद शिंदी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.