अहमदनगर मध्ये एसटी बस कामगारांचा संप आज दुपारच्या चर्चेनंतर  मिटला

    अहमदनगर : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एसटी बस कामगारांचा संप आज दुपारच्या चर्चेनंतर मिटला असून पोलिस बंदोबस्तात बस रवाना होत आहेत.

    एसटी संप मागे घेण्याबाबत कोणताही कर्मचारी बोलण्यास तयार नसल्याने शेवगाव तालुक्यातील आंदोलनाला पुढाकार घेणारे संजय नांगरे यांनी पत्रकारांशी बोलताना मत स्पष्ट केले. जरी एसटी कर्मचारी यानी काम चालू केले असले तरी सुद्धा विलीनीकरण करण्यावर एसटी कर्मचाऱ्याचे ठाम असल्याचे मत आहे. असंही ते म्हणाले.