महात्मा गांधींबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य भोवलं; कालीचरण महाराजला मध्यप्रदेशात अटक

कालीचरण महाराज याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून कालीचरणविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही त्याने आपले वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले होते. कालीचरण विरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून अटक करण्यात आली.

    नवी दिल्ली : महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. कालीचरण महाराजाविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून अटक करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.

    कालिचरण महाराजांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं? 

    कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून कालीचरणविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही त्याने आपले वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले होते. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरण महाराजाचा शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली.

    कालीचरण महाराज कोण आहे? 

    ‘कालीचरण महाराज’ अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्यांचे मूळ नाव ‘अभिजीत धनंजय सराग’ असं आहे. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा ‘कालीपुत्र कालीचरण’ झाला. पुढे लोकांनी त्यांना ‘महाराज’ असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.