मेडिकलचे शटर उचकटून चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद

बारामती शहरातील मेडिकलचे शटर उचकून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास रंगेहाथ पोलिसांनी पकडले असून, त्याच्यावर पुणे शहारातील घरफोडीचे २१ गुन्हे दाखल आहेत. आकाश विठ्ठल पाटोळे असे या चोरट्याचे नाव आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहरातील मेडिकलचे शटर उचकून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास रंगेहाथ (Baramati Crime) पोलिसांनी पकडले असून, त्याच्यावर पुणे शहारातील घरफोडीचे २१ गुन्हे दाखल आहेत. आकाश विठ्ठल पाटोळे असे या चोरट्याचे नाव आहे. त्याला मेडिकलचे शटर उचकटून आत जाताना नागरिकांनी पाहिले, तत्काळ बारामती पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

    बारामती शहर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले असता, आरोपी हा भिंतीवरून उडी मारून पळून जात असताना खाली पडून जखमी झाला होता. त्यास पोलिसांनी महिला हॉस्पिटल बारामती येथे उपचार कामे दाखल केले. आरोपी आकाश पाटोळे याने पाटील मेडिकल मोतीबाग बारामती येथे चोरी करण्यात आल्याची कबुली दिली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पुणे शहरामध्ये घरफोडीचे २१ गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश विठ्ठल पाटोळे यांच्याकडून रोख २१०० रुपये तसेच पुणे शहरातून चोरी केलेली एक पांढरे रंगाची स्कूटी पोलिसांनी जप्त केली आहे.

    पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार अरुण रासकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहाय्यक फौजदार अरुण रासकर, संजय जगदाळे, पोलिस नाईक कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, मनोज पवार यांनी केली आहे.