मेहबुब शेख प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; चित्रा वाघ यांनी बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचा पीडितेचा आरोप

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांच्यावर एका पीडितेने अत्याचाराचे आरोप केले होते. या प्रकरणात आता पीडितेने नवा खुलासा केला आहे. याप्रकरणी आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी खोटी बलात्काराची तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप पीडितेने केला आहे. वाघ यांच्यावर या अगोदरही असा आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळणं घेतले आहे(The victim alleged that Chitra Wagh had asked her to file a false complaint of rape in the Mehboob Sheikh Case).

    औरंगाबाद: काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांच्यावर एका पीडितेने अत्याचाराचे आरोप केले होते. या प्रकरणात आता पीडितेने नवा खुलासा केला आहे. याप्रकरणी आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी खोटी बलात्काराची तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचा आरोप पीडितेने केला आहे. वाघ यांच्यावर या अगोदरही असा आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळणं घेतले आहे(The victim alleged that Chitra Wagh had asked her to file a false complaint of rape in the Mehboob Sheikh Case).

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या तरुणीने नवीन खुलासा केला असून, भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल केल्याच पीडित तरुणीने आरोप केला आहे. याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला आहे. ज्यात एफआयरमध्ये सुरेश धस, चित्रा वाघ आणि मालेगाव येथील माजी नगरसेवक नदमोद्दीन शेख यांची नावे आहेत.

    या प्रकरणी चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे. पीडितेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीच भाग पाडले म्हणत तक्रार केली आहे, हे माध्यमातून कळल ज्या केसेसमध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक सगळ्या चौकशींना मी तयार आहे. आम्ही त्या मुलीला मदत केली आहे. आम्ही चौकशीला जायला तयार आहे. असे अनुभव येत असतात तरीही आम्ही घाबरणार नाही.

    मेहबुब शेख म्हणाले, मला एफआयआरची प्रत मिळाली नाही. मला एफआयआरची प्रत मिळाल्यावर मी सविस्तरपणे बोलतो. पण मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, डोळ्यात पाणी आणून सांगितले आणी नियतीने सत्य समोर आणले. उसके घर मै देर है अंधेर नाही, सत्य परेशान हो सकता है पराजीत नही. त्याचबरोबर जे कुणी नेते यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केल्याशिवाय गप्प राहणार नाही.