पत्नी माहेरी गेल्याने संतापलेल्या पतीने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला! बिहारमधील धक्कादायक घटना

या तरुणाची पत्नी मकर संक्रांतीनिमित्त तिच्या माहेरी गेली होती. ती अजून परतली नव्हती. याचा राग मनात धरुन पतीने धारदार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.

    बिहार : बिहारच्या मधापुरामध्ये (Bihar Crime News) एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. येथे पत्नी माहेरी गेल्याने संतापलेल्या पतीने त्याचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    मधापुरामधील राजनी नयनगरमध्ये ही घटना घडली आहे. येथे एका तरूणाची पत्नी तिच्या माहेरी घरी गेली. मात्र बरेच दिवस झाल्यानंतरही ती परत आली नव्हती. त्यामुळे तरूणाला यावर राग आला आणि त्याने आपला खासगी भाग धारदार शस्त्राने कापला. या घटनेनंतर, जेव्हा कुटुंबाला माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ताबडतोब रुग्णालयात धाव घेतली.

    25 वर्षांच्या तरुणांने गव्हल्पदा पोलिस स्टेशन परिसरातील मालोध वॉर्डच्या मुलीशी लग्न केले होते. त्या युवकाच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की त्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. हा तरुण पंजाबमध्ये बाजारात काम करतो. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो घरी आला होता. तेव्हापासून तो घरीच राहतो.