मोबाईल चार्जरच्या वायरने हात बांधले; युवकाची घरातच गळा दाबून हत्या

दोन्ही हात बांधून गळा दाबून युवकाची हत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या चामोर्शी मार्गावरील आशीर्वाद नगरात घडली. ही घटना काल सोमवारी सायंकाळी ७. ३० वाजता उघडकीस आली. सुबोध केलसडीन जनबंधु (२०) रा. आशीर्वाद नगर गडचिरोली असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

    गडचिरोली (Gadchiroli):  गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल चार्जच्या वायरने युवकाचे दोन्ही हात बांधून मग गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

    दोन्ही हात बांधून गळा दाबून युवकाची हत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या चामोर्शी मार्गावरील आशीर्वाद नगरात घडली. ही घटना काल सोमवारी सायंकाळी ७. ३० वाजता उघडकीस आली. सुबोध केलसडीन जनबंधु (२०) रा. आशीर्वाद नगर गडचिरोली असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

    प्राप्त माहितीनुसार सुबोधचे भाऊ बहिण व लहान भाऊ रविवारी सकाळी कामानिमित्त दुसऱ्या गावाला गेले होते. सुबोध घरी एकटाच होता. सोमवारी रात्री ७.३० वाजता आई वडील घरी परतले असता सुबोधचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत पलंगावर पडून असल्याचे दिसून आले. सुबोधला अशा अवस्थेत पाहिल्यावर आई- वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.