भरकोर्टातच महिलेने 13 महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटलं; मग कोर्टानं…

मध्य प्रदेशात एका महिलेने आपल्या 13 महिन्यांच्या बाळाला भर कोर्टामध्येच जमिनीवर आपटले होते. याप्रकरणी महिलेविरोधात 2022 मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    भोपाळ : मध्य प्रदेशात एका महिलेने आपल्या 13 महिन्यांच्या बाळाला भर कोर्टामध्येच जमिनीवर आपटले होते. याप्रकरणी महिलेविरोधात 2022 मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने या महिलेला दिलासा देण्यास नकार दिला.

    न्यायालयाने सांगितले की, बाळाला जमिनीवर आपटणे हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. आरोपी  महिलेचे हे रुप पाहून न्यायमूर्ती देखील सुन्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पोटगीसंदर्भात याचिकेवर सुनावणी सुरु होती. आरोपी महिलेचे नाव भारती पटेल असे आहे. महिलेने आपल्या दुःखासाठी बाळाला जबाबदार धरले होते. त्यामुळे तिने आपल्या बाळाला जमिनीवर फेकले.

    महिलेने मुलाच्या दिशेने पेपरवेट देखील फेकून मारला होता. सुदैवाने पेपरवेट मुलाला लागला नव्हता. त्यामुळे बाळाचा जीव वाचला होता. त्यावेळी पती कोर्टात उपस्थित नसल्याने तिने आरडाओरड सुरु केला होता. दरम्यान, या प्रकरणी सर्व परिस्थिती पाहून सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन बाळगू शकत नाही. त्यामुळे याचिका फेटाळली जात असल्याचे न्यायालयाने सांगितले.