New Covid variant Omicron: Dombivali followed by Pune found six patients of Omicron; Excitement in Maharashtra

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ऑमीक्रोनने जगभराची चिंता वाढवली आहे. भारतासह जगभरातील अनेक देशात ऑमीक्रोनचे रुग्ण वाढत चालले आहे. ऑमीक्रोनमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे, असा इशारा राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीने दिला आहे(The year 2022 is extremely dangerous! Omicron increased tension; Supermodel Committee warns of third wave in New Year).

  दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ऑमीक्रोनने जगभराची चिंता वाढवली आहे. भारतासह जगभरातील अनेक देशात ऑमीक्रोनचे रुग्ण वाढत चालले आहे. ऑमीक्रोनमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे, असा इशारा राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीने दिला आहे(The year 2022 is extremely dangerous! Omicron increased tension; Supermodel Committee warns of third wave in New Year).

  देशात दररोज सुमारे 7500 कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र ऑमीक्रोनमुळे हा आकडा लवकरच वाढण्याची शक्यता आहे. समितीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले की, ऑमीक्रोनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरी ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्रभावी ठरेल. कोरोनाची तिसरी लाट पुढील वर्षी येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

  डेल्टा व्हेरिएंटची जागा घेईल

  पूर्वीपासून सुरू असलेल्या लसीकरणामुळे तिसरी लाट तितकी प्रभावी होणार नाही. पण, तिसरी लाट नक्कीच येईल. सध्या कोरोनाचे दैनंदिन रुग्ण 7500 च्या आसपास आहेत. मात्र, ऑमीक्रोन डेल्टा व्हेरिएंटची जागा घेईल आणि तसतसा हा आकडा झपाट्याने वाढेल. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत दैनंदिन प्रकरणे कमी असतील, असे विद्यासागर म्हणाले. समितीचे आणखी एक सदस्य, मनिंदा अग्रवाल यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेसह ज्या देशात ऑमीक्रोनची प्रथम ओळख झाली होती, तेथे ऑमीक्रोन रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसते. सुरुवातीला रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही, मात्र आता ती परिस्थिती ओढवली आहे.

  सुपर व्हेरिएंटची शक्यता

  ऑमीक्रोननंतर कोरोनाचा सुपर व्हेरिएंटही येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुपर व्हेरिएंट येत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी ओमायक्रोन व्हेरिएंट आणि डेल्टा व्हेरिएंट एकत्र मिळून एखाद्याला संक्रमित केले तर कोरोनाचा नवा सुपर व्हेरिएंट तयार होऊ शकतो. सामान्यतः लोकांना कोरोनाच्या फक्त एका म्युटेंट स्ट्रेनचा संसर्ग होतो. काही विशेष प्रकरणांमध्ये एकाच वेळी दोन स्ट्रेन रुग्णाला संक्रमित करतात. जर डेल्टा आणि ओमायक्रोन या दोन्ही व्हेरिएंटने एकालाच संक्रमित केले तर ते एकमेकांशी डीएनएची देवाणघेवाण करू शकतात आणि जर हे दोघे एकत्र आले तर कोरोनाचा नवा सुपर स्ट्रेन तयार होऊन कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो, असे मत बर्टन यांनी व्यक्त केले आहे.

  राज्यात आणखी आठ ‘ऑमीक्रोन’रुग्ण आढळले

  राज्यात कोरोनाच्या नव्या विषाणू ऑमीक्रोनने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात आणखी 8 रुग्ण ऑमीक्रोनबाधित आढळून आल्याने राज्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत राज्यात एकूण 48 ऑमीक्रोन विषाणूबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, राज्यात आणखी 8 रुग्ण ऑमीक्रोन बाधित आढळले आहेत. यापैकी 4 रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर 3 रुग्ण सातारा येथे आणि 1 रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत. मुंबईतील चारही रूग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे. इतर 3 रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. यातील दोघांनी दक्षिण आफ्रिकेचा, एकाने टांझानियाचा तर एकाने इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत.

  दीड ते तीन दिवसांत रुग्ण दुप्पट

  ऑमीक्रोनबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. या व्हेरियंटने 89 देशांत शिरकाव केला आहे. गंभीर बाब म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे समूह संसर्गाचा धोका असलेल्या देशांत ऑमीक्रोन व्हेरियंटचे रुग्ण दीड ते तीन दिवसांत दुपटीने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. याआधी डेल्टा व्हेरियंटने भारतासह जगभरात हाहाकार घातला होता. पण कोरोनाचा नवा व्हेरियंट ऑमीक्रोन हा आता डेल्टा पेक्षाही वेगाने पसरत आहे. विशेषतः ज्या देशांत समूह संसर्गाचा धोका आहे तिथे नव्या व्हेरियंटचा प्रसार दीड ते तीन दिवसांत दुप्पट वेगाने होत असल्याचे डब्ल्यूएचओने नमूद केले आहे.