पबजी खेळता खेळता जुळले लग्न; नवरी डायरेक्ट नवरदेवाच्या दारात पोहचली आणि…

तरुणाईला पबजी या खेळाने प्रचंड वेड लावले. हा खेळाचे अनेकांना व्यसन जडले. मुले तासनतास हा खेळ खेळत असतात. खरंतर हे व्यसन सोडविण्यासाठी काहीजण उपचारही घेत आहेत.असे असताना पश्चिम बंगालमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. पबजी खेळता खेळता तरुण-तरुणी प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले(The youngsters fell in love while playing pubji in West Bengal and got married).

    पश्चिम बंगालच्या धुपगुडी येथील सैनूर आलमला पबजी खेळण्याचे व्यसन लागले होते. खेळादरम्यान त्याची ओळख कर्नाटकातील फिरजा नावाच्या मुलीशी झाली. दोघेही खेळता खेळता एकमेकांशी चॅट करायला लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. नंतर एकमेकांशी बोलायला लागले आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

    फिरजा अचानक बंगळुरूवरून विमानाने धूपगडीला प्रियकराच्या घरी पोहोचली. जेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली त्यावेळी सैनूरला तिला दारात पाहून धक्काच बसला. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. दारात त्याची प्रेयसी उभी होती. त्यानंतर त्यांची ही प्रेमकहाणी त्यांच्या घरच्यांना समजली आणि त्यांनी कसलाच खो न घालता धुमधडाक्यात त्यांचे लग्न लावून देण्यात आले.

    हे सुद्धा वाचा
    • 2022