तरुणांनी उड्डाणपुलावरून १५ किलोचा दगड फेकला पोलिसांच्या दिशेने आणि….

    अमरावती (Amravati) : शहरात संचारबंदीच्या दरम्यान रात्री फिरणाऱ्या दोन युवकांना राजकमल चौकात कार्यरत एसआरपीएफ जवानांनी तीन दिवसांपूर्वी हटकलं होतं. याच रागातून दुचाकीवरील युवकांनी उड्डाणपूल गाठला आणि सुमारे १५ किलो वजनाचा दगड उचलून एकाने चौकात खाली उभा असलेल्या पोलिसांच्या दिशेने टाकल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

    या दोन्ही आरोपींविरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल झाला होता. राजापेठच्या पोलिसांनी घटना घडल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुपारपर्यंत सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना आता ताब्यात घेण्यात आलं आहे.