
महापूर व अतिवृष्टी काळात शेतीपंपाचे वीज कनेक्शन बंद असताना देखील भरमसाठ वीज बिल आकारून शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या महावितरण कंपनीच्या गारगोटी कार्यालयास सोमवारी (दि.६) टाळेठोक आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा आकुर्डे ग्रामस्थांच्या वतीने नाथाजी पाटील (Nathaji Patil) यांनी दिला.
गारगोटी : महापूर व अतिवृष्टी काळात शेतीपंपाचे वीज कनेक्शन बंद असताना देखील भरमसाठ वीज बिल आकारून शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या महावितरण कंपनीच्या गारगोटी कार्यालयास सोमवारी (दि.६) टाळेठोक आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा आकुर्डे ग्रामस्थांच्या वतीने नाथाजी पाटील (Nathaji Patil) यांनी दिला.
अनेक शेतकऱ्यांचे मोटरपंप, पेट्या, पाईपलाईन, महापूरात वाहून गेले असताना महापूर काळात महावितरण कंपनीने अनेक शेतकऱ्यांना भरमसाठ बिले दिली आहेत. आता ही बिले भरली नाहीत म्हणून आता विजजोडणी देत नाहीत. त्यामुळे आज गारगोटी महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाव विचारण्यासाठी आज शेतकरी गेले होते. यावेळी बिलातील प्राथमिक त्रुटी दाखऊन सोमवारी (दि.६) कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी नाथाजी पाटील, प्रकाश पाटील, भिमराव भंडारी, शामराव पाटील, बाळासाहेब कुपटे, निवास भंडारी, भास्कर तेलंग, शामराव पाटील, दत्तात्रय पोवार, धनाजी पाटील, रविंद्र पाटील, दिगंबर कुंभार, मानाजी पोवार,गजराज पाटील, धनाजी पोवार, पांडूरंग पोवार , शिवाजी पोवार, भास्कर पोवार, नामदेव पाटील आदी शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.